वृत्तसंस्था/ मुंबई
विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेतील 16 वर्षाखालील वयोगटाच्या विभागात बुधवारी झालेल्या सामन्यात मध्यप्रदेशविरुद्ध खेळताना सिक्कीम संघाचा डाव केवळ 6 धावात संपुष्टात आला.
सुरतमध्ये हा सामना खेळवला गेला. मध्यप्रदेशच्या गिरीराज शर्माने आपल्या 5 षटकात एका धावेच्या मोबदल्यात पाच बळी मिळवले. तसेच अलिफ हसनने आपल्या 4.3 षटकातील गोलंदाजीत 4 धावात 5 गडी बाद केले. सिक्कीमच्या सात फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही. सिक्कीमचा डाव 57 चेंडूत समाप्त झाला. मध्यप्रदेशने हा सामना 365 धावांनी जिंकला. तत्पुर्वी मध्यप्रदेशने आपला डाव 8 बाद 414 धावावर घोषित केला होता. सिक्कीमचा पहिला डाव 43 तर दुसरा 6 धावात आटोपला.
संक्षिप्त धावफलक ः मध्यप्रदेश 8 बाद 414 डाव घोषित (एम. चव्हाण 170, पी. शुक्ला 86, अक्षयाद 4-87), सिक्कीम प. डाव सर्वबाद 43 (भंडारी 5-20, सारडाना 3-21), सिक्कीम दु. डाव सर्वबाद 6 (गिरीराज शर्मा 5-1, अलिफ हसन 5-4).









