इचलकरंजी / प्रतिनिधी
खोतवाडी ( ता. हातकणगंले ) मराठी शाळेशेजारी राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरी तुळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश सुनील खोत ( वय 20 ) असे त्यांचे नाव असून, तो एकुलता आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याची नोंद शहापूर पोलिसात झाली असून, आत्महत्येचं नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
गणेशने गळफास घेतल्याची घटना नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याच्या गळ्याभोवतीचा फास सोडविला. त्याला उपचाराकरिता इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेशने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांसह मित्र मंडळींना समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्याचा मृतदेह पाहताचा अनेकांना अश्रू अनावर झाले.
Previous ArticleKolhapur : युनिटी मोटर्स शोरूम मध्ये 16 लाखाची कॅश चोरी
Next Article चेन्नईकडून पुन्हा मुंबई बॅकफूटवर









