वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 साली भारतामध्ये विश्वचषक खो-खो स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारतीय खो-खो संघाच्या सरावाला येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.
विश्वचषक खो-खो स्पर्धा दिल्लीतील इंदिरा गांधी इन डोअर स्टेडियमध्ये 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेला आता एक महिना बाकी राहिला असून यजमान देशाचा संघ आतापासूनच कसून सरावावर भर देत आहे. हे शिबिर तब्बल महिनाभर चालणार आहे. या शिबिरात सुमारे 60 खो-खोपटू सहभागी होणार असून आश्विनी शर्मा या प्रमुख प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.









