प्रतिनिधी
बांदा
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल १०० टक्के इतका लागला आहे. प्रशालेतून चैतन्य सुहास बांदेकर व राज जीवबा वीर ९७.६० टक्के मिळवून दोघांचा विभागून प्रथम, सुयश सुनील राठोड ९७.२० टक्के दृतीय व चिन्मय शांताराम असणकर ९५.८० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकवीला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ९४ प्रविष्ठ झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले . प्रशालेच्या निकाल १०० टक्के इतका लागला आहे. संस्थेचे पदाधिकारी, पालक, व प्राचार्य यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous Articleकळसुलकर हायस्कूलमधून वेदिका ताटे प्रथम
Next Article ओटवणे हायस्कूलमधून श्रद्धा चिले प्रथम









