वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर तिसऱ्या खेलो इंडियाच्या कनिष्ठ महिलांच्या हॉकी लिग स्पर्धेला मोठ्या थाटात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते तसेच 1972 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघातील अशोक ध्यानचंद यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण 13 संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा 22 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचा दुसरा टप्पा 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी विनितकुमार, श्रीमती सुश्मिता ज्योत्सी, महेश दयाल, प्रितम सिवाच व अन्य मान्यवर उपस्थित होते.
अमेरिकन स्पर्धेतून किरगॉईसची माघार









