वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमधील चंदीगढ विद्यापीठाच्या मैदानावर खेलो इंडियातर्फे राष्ट्रीय वरिष्ठ महिलांची खो खो लिग स्पर्धा 10 ते 13 जानेवारीदरम्यान घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये होईल. अखिल भारतीय खो खो फेडरेशनने ही लिग खोखो स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा युवजन मंत्रालयातर्फे पूर्ण आर्थिक निधी मंजूर करण्यात आले आहे.
ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धेसाठी एकूण 32.25 लाख रुपये मंजूर केले आहेत. विजेत्यांसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 18 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये 12 संघातील 200 खो खोपटू सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे 16 ते 19 जानेवारी दरम्यान खो खो महिला लिग कनिष्ठ आणि उपकनिष्ठ वयोगटासाठी रांचीमध्ये होणार आहे.









