खेड :
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान, नेत्रदान शिबिरासह चित्रकला, मॅरेथॉनसह शरीरसौष्ठव तसेच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा समावेश असल्याची माहिती शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपशहरप्रमुख स्वप्निल सैतवडेकर यांनी दिली.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित खांबतळे येथील बहुउद्देशीय सभागृहात इयत्ता ५वी ते ८वी गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. १७रोजी दुपारी २ वाजता वेरळ येथील अनुग्रह मतिमंद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. १८ रोजी सकाळी ७ वाजता पुरुष व महिला गटात मॅरेथॉन स्पर्धा होईल. १४ ते १७वर्षापर्यंत पुरुष व महिला गट तसेच १८ वर्षे ते २० वर्षे असा वयोगट आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून स्पर्धेस प्रारंभहोऊन नियोजित मार्गाने त्याच ठिकाणी समाप्ती होईल. सकाळी १० वा. शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित बहुउद्देशीय सभागृहात रक्तदान शिबीर होईल. गुलमोहर पार्क येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत नेत्रतपासणी शिबीर होईल. याचदिवशी सकाळी ११ वाजता खांबतळे येथील शंकर मंदिरात द्राभिषेक, सायंकाळी ६ वा. भरणे येथील बिसू हॉटेल येथे जिल्हास्तर व तालुकास्तरीय वजनी गट शरीरसौष्ठव स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होईल. याचवेळी कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा अभीष्टचिंतन सोहळा पार पडल्यानंतर विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपशहरप्रमुख स्वप्निल सैतवडेकर, माजी नगरसेवक मिनार चिखले, संजय मोदी, राजेश बुटाला, सतीश चिकणे, पराग चिखले, युवासेना शहर अधिकारी सिद्धेश खेडेकर, महिला आघाडीच्या शहर संघटिका माधवी बुटाला यांसह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.








