पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात मोठा मतभेद निर्माण झाल्यानंतर त्या राज्यात काही ठिकाणी खर्गे यांनी पोस्टर्स फाडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काँग्रेसने आपल्या राज्यातील कार्यकर्त्यांना इशारा दिला.
काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, अशी मागणी चौधरी यांनी केली होती. तथापि, बॅनर्जी या विरोधकांच्या आघाडीच्या सदस्या आहेत. त्यामुळे काँग्रेस त्यांच्याशी जुळवून घेणार आहे. ज्यांना त्यांच्याशी जुळवून घ्यायचे नसेल त्यांनी काँग्रेस बाहेर जावे, असा इशारा खर्गे यांनी दिला होता. त्यामुळे चौधरी आणि खर्गे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये आघाडी नाही
पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांची आघाडी नाही. मात्र अशी आघाडी देशात असून तृणमूल काँग्रेस या देशातील आघाडीमध्ये समाविष्ट आहे, अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती. त्यामुळे चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसशी संबंध नको, अशी भूमिका मांडली होती.








