थिरुवनंतपूरम : काँग्रेसमध्ये नवीन बदलासाठी आणि कॉंग्रेसच्या प्रगतीसाठी ते पक्षातील सर्वोच्च पदाच्या निवडणूकीला उभारले असून मलिकार्जुन खर्गे हे कॉंग्रेसमधील सध्याच्या “स्थिती”चे प्रतिनिधित्व करतात. सध्याची व्यवस्था ही यथास्थितीच्या मागे धावत आहे. आणि याचे मला आश्चर्य वाटत नाही. असे मत राष्ट्रिय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले. ते आज थिरुअनंतपूरम येथून उमेदवारी अर्ज सादर करताना माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते कॉंग्रस मतदारांना उद्देशून बोलताना म्हणाले “तुम्हाला जर आहे तिच स्थिती हवी असेल तर तुम्ही खर्गे यांना जरूर मत द्यावे…पण जर तुम्हाला पक्षात बदल आणि प्रगती हवी असेल, तर त्या बदलासाठी मी उभा राहीन.”
गांधी परिवाराने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे य़ावर विचारले असता. ते म्हणाले की “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आश्वासन दिले आहे की, “असा कोणताही अधिकृत उमेदवार नसून गांधी कुटुंबीय तटस्थ राहतील. त्यामुळे मला कोणाचाही अनादर करायचा नाही. ही एक मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. आणित्या भावनेने मी माझी उमेदवारी पुढे केली आहे.आपल्याला खर्गे यांचा अनादर नाही. ते त्यांच्या व्हिजनसाठी उभे राहतील आणि मी माझ्या विचारांचे प्रतिनिधित्व करेन” असे थरूर म्हणाले. 17 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









