बेळगाव : भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्या असे की, मनुष्याने आपल्या मातीशी एकनिष्ठ राहावे, तिचे महत्त्व विसरू नये यासाठी नागपूजा, गणेश पूजा, पोळा साजरा करतो. जीवनात सातत्याने उपयोगी पडणारी, अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देणारी शस्त्रास्त्रsसुद्धा महत्त्वाची आहेत. याच कारणास्तव नवरात्रीमध्ये नवमीदिवशी शस्त्रास्त्र पूजन केले जाते, ज्याला आपण खंडेनवमी असेही म्हणतो. शहर परिसरात खंडेनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. याला दंतकथांचाही आधार आहे. आदिशक्तींनी असुरांसमवेत युद्ध केले आणि भक्तांनाच नव्हे तर देवांनाही संरक्षण दिले. त्याचे स्मरण राहावे, यासाठी शस्त्रपूजा केली जाते. पांडवांनी अज्ञातवासात आपली शस्त्रs शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली आणि खंडेनवमी दिवशी अज्ञातवास संपल्यावर ती पुन्हा मिळवली व त्यांची पूजा केली, अशी आख्यायिका आहे. शस्त्रास्त्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विधी मोठा अनुपम आहे. घराघरांमध्ये वापरली जाणारी अवजारे तसेच पुस्तक, दौत आणि बोरू यांची सफाई करून झेंडूच्या फुलांनी सजवून पूजा करण्यात आली. शेतकऱ्यांनीही मळणी आणि कापणी यंत्रांचे पूजन केले. अनेक शोरुममध्येही वाहनांची पूजा करण्यात आली. काही ठिकाणी याच निमित्ताने कन्या पूजनही करण्यात आले. कुमारिकांना बोलावून त्यांना फूल आणि वस्त्र देऊन तृप्त केल्यास घरामध्ये सुख, शांती नांदते, अशी धारणा आहे.
Previous Articleखंडेनवमीनिमित्त गँगमनने केली रेल्वेरूळांची पूजा
Next Article कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









