खानापूरः खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवार दि. 30 रोजी होणाऱया बैठकीबाबत काही जणांनी माझी दिशाभूल करून एक संदेश पसरवण्यात आला आहे. तो संदेश धादांत खोटा आहे. त्यामुळे ही बैठक सोमवार दि. 30 रोजीच होणार आहे. याबाबत समिती कार्यकर्त्यांनी कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे व आपले विचार मांडावेत, असे आवाहन समितीचे ज्ये÷ नेते देवाप्पा गुरव यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील उपस्थित होते. यावेळी दिगंबर पाटील म्हणाले, एकीच्या प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर काही लोक एकीत खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. समितीची एकी झालेली आहे. आता पुढील नियोजन करून तालुक्मयात जागृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवार दि. 30 रोजी होणाऱया समितीच्या बैठकीला तालुक्मयातील समस्त समिती कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून आपले विचार मांडावेत, असे ते म्हणाले. मारुती गुरव म्हणाले, वयाचा विचार न करता माझ्या वडिलांची दिशाभूल करून त्यांना लिहिलेलं वाचण्यात देऊन व्हिडिओ करून त्यांच्याकडून दिशाभूल करणारा संदेश पसरविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये जो गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे. कार्यकर्त्यांनी गैरसमज बाळगू नये. सोमवारी होणाऱया बैठकीला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे सांगितले.









