नागरिकांचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना निवेदन
खानापूर : खानापूर-लिंगनमठ रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. या रस्त्यावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. कक्केरी येथील बिस्टम्मा देवीची यात्रा 11 ऑक्टोबर रोजी भरणार आहे. या यात्रेला लाखो भाविक दर्शनासाठी येत असताना या यात्रेपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कक्केरी-लिंगनमठ भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते राजेंद्र होनकांडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. बेळगाव-तालगुप्पा राज्य महामार्गावरील खानापूर-लिंगनमठ या मुख्य रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी तुंबून डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना धोकादायक बनले आहे. या रस्त्यारवरुन प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रोज छोटेमोठे अपघात घडत आहेत. खानापूर-हल्याळ या रस्त्याचा 20 वर्षापूर्वी विकास करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याच्या देखाभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता धोकादायक बनला आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
कक्केरी येथील बिस्टम्मा देवीची 11 ऑक्टोबरपासून यात्रा सुरू होणार आहे. या देवीच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यासाठी यात्रेपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन कक्केरी-लिंगनमठ येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते राजेंद्र हेंनकांडे यांना दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा भेंडिगेरी, विठ्ठल हिंडलकर, रवि मादीगार, रवि मादार यासह इतर नागरिक उपस्थित होते.









