कंत्राटदार गायब, नागरिकांना नाहक त्रास
वार्ताहर /रामनगर
गोवा-बेळगाव महामार्गावरील खानापूरपासून अनमोडचे दुपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम गेली चार ते पाच वर्षापासून चालू आहे. परंतू कोणत्या ना कोणत्या अडथळ्यामुळे सदर काम तेथेच थांबले होते. परंतु गेल्या दीड वर्षापासून सर्व अडथळे दूर होऊन नव्याने टेंडर प्रक्रिया करून खानापूरपासून अनमोडपर्यंतचे काम पुणे येथील कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले. पुणे येथील कॉन्ट्रॅक्टरने सदर काम सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून विजापूर येथील कॉन्ट्रॅक्टरला दिले. परंतु सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेला कॉन्ट्रॅक्टर इतके मोठे काम घेण्याच्या योग्यतेचा नसल्याने त्याला झेपेल तसे कूर्मगतीने काम चालू ठेवले आहे. तर आता रामनगर-अनमोड मार्गावर पूर्णत: काम ठप्प आहे. सदर कॉन्ट्रॅक्टरचा एकही कामगार रस्त्यावरून फिरतानासुद्धा दिसून येत नाही. त्यामुळे आणखी किती वर्षे येथील प्रवाशांना ख•dयांचा सामना करावा लागणार? हाच मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे खानापूर अनमोड काम घेतलेला ठेकेदार हरवला असल्यास अधिकाऱ्यांनी त्याला शोधावे, अशी चर्चा आता सुरू आहे.









