इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची टिप्पणी
वृत्तसंस्था/तेल अवीव
इराणचे सर्वेसर्वा अयातोल्ला अली खमेनी हे दहशतवादी मनोवृत्तीचे असून ते जगण्याच्याही योग्यतेचे नाहीत, अशी तीव्र टिप्पणी इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी केली आहे. इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्रायलला नष्ट करणार अशी घोषणा खमेनी यांनी वारंवार केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. इराणच्या हाती अणुबाँब आल्यास इस्रायलवर तो टाकला जाणारच नाही, याची कोणतीही शाश्वती नाही, असे वक्तव्य त्यांनी गुरुवारी केले आहे. इराणचे नेते खमेनी यांना आता जिवंत ठेवता कामा नये. रुग्णालयांवर हल्ला करण्याचा आदेश ते स्वत: व्यक्तीश: देत आहेत. त्यांची सर्वसामान्यांसंबंधीची संवेदनशीलता संपलेली आहे. त्यांना केवळ निरपराध माणसे मारण्यात स्वारस्य आहे. अशी व्यक्ती नेहमीच मानवतेला धोका असते. त्यामुळे आता त्यांना व्यक्तीश: लक्ष्य करण्यात विलंब लागता कामा नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.









