चंदीगड :
पंजाबमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खलिस्तान समर्थक आणि खादूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांच्या निकटवर्तियांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून मोगा आणि अमृतसरमध्ये छापेमारी सुरू झाली. अमृतपालचे काका, भावजय आणि अन्य एका नातेवाईकाच्या अमृतसरमधील घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. अमृतपाल सिंग यांच्यावर एनआयएने विदेशातून निधी आणल्याच्या प्रकरणात छापा टाकल्याचा अंदाज आहे. दिवसभर याप्रकरणी कारवाई सुरू होती. मात्र, या कारवाईविषयी कोणतीही सविस्तर माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आलेली नाही.









