खलिस्तान क्यो माँग रहे हो, हिंदुस्थान तुम्हारा है.. संपूर्ण देश एक असताना वेगळ्या खलिस्तानची मागणी का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र देशाचे तुकडे पाडण्याची सुपारी केवळ खलिस्तानवादी दहशतवाद्यांनीच घेतली नाही तर ती काही देशांनीदेखील घेतली आहे. यासाठी खलिस्तानवादी दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यास सुऊवात झाली आहे. मात्र देश बदलला आहे. देशात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला घरात घुसुन मारण्यास सुऊवात झाली आहे. याचा परिपाक म्हणजे खलिस्तानवाद्यांची लष्कर-ए-खालसा ही संघटना जवळ जवळ उद्धवस्त झाली आहे.
अखंडप्राय भारत देशाचे तुकडे पाडण्यासाठी अनेक राष्ट्रे टपून बसली आहेत. ज्यांनी मित्र असल्याचा मुखवटा परिधान केला आहे ती राष्ट्रे देखील आतुन कुटनीतीचा अवलंब करीत आहेत. मात्र हे समजायला आपला देश किंवा सत्ताधारी काही दुधखुळी नाहीत. शेजारील राष्ट्र असलेले पाकिस्तान तर आधीपासूनच देशाचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्या साथीला चीन, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि आता जर्मनीदेखील आहे. भारतातील मुख्य शहरात सातत्याने कशा प्रकारे धुसफुस राहील यासाठी ही राष्ट्रे प्रयत्न करीत आहेत. मात्र भारत देश पहिल्यासारखा राहिला नाही. सहनशिलतेला देखील अंत असतो. ज्यावेळेस सहनशिलतेचा अंत होतो तेव्हा भारत देश घरात घुसुन मारतो, हे दाखविण्यास सुऊवात झाली आहे. यामुळे भारत देशाचा धसका अमेरिकेसह सर्व राष्ट्रांनी घेतला आहे. तरी देखील या राष्ट्रांनी देशातील परिस्थिती धुमसत ठेवण्यासाठी वेळोवेळी खलिस्तानवाद्यांना बळ दिले आहे. मात्र देशाने या खलिस्तानवाद्यांचे कंबरडे मोडत त्यांच्या लष्कर-ए-खालसा ही संघटनाच उद्धवस्त केली आहे.
आमने-सामनेच्या लढाईत आपणाला कदापी यश मिळणार नाही. हे ओळखून असलेल्या पाकिस्तानने वेळोवेळी खलिस्तान चळवळीला पेटत ठेवले. केवळ पंजाबच नाही तर मुंबईत देखील खलिस्तानवाद्यांनी एकेकाळी दहशत माजविली होती. मात्र मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांनी खलिस्तानवद्यांचा एन्काऊंटर करीत त्यांची दहशत मोडून काढली होती. मात्र आजही छुप्या पद्धतीने अनेक खलिस्तानवाद्यांनी मुंबईतच नाही तर देशातील अनेक ठिकाणी आश्रय घेतला असून, तेथून ते दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पाहिले तर ब्ल्यु स्टार ऑपरेशननंतर 1990 च्या दशकात भारतीय सैन्य आणि पोलिसांनी खलिस्तानवाद्यांचे पूर्ण कंबरडे मोडले होते. मात्र या चळवळीला पुन्हा जीवंत करण्याचे काम केले ते पाकिस्तानी आयएसआय या संघटनेने. याला छुपा पाठिंबा दिला तो चीन सरकार आणि त्यांच्या गुप्तचर संघटनेने. त्याचा परिपाक असा झाला की काही दिवसापूर्वी कॅनडा येथे हरदिपसिंग निज्जर या खलिस्तानवाद्याची सरी येथे गोळ्या झाडून हत्या झाली. याचे खापर कॅनडा सरकारने भारतीय गुप्तचर यंत्रणारॉ वर फोडले. येथील भारत सरकारच्या डिप्लोमॅट अधिकाऱ्याला देश सोडण्यास भाग पाडले. भारतीय नागरिकांना कॅनडाचा व्हिसा देण्यास मज्जाव करण्यात आला. कॅनडा सरकारने एका दहशतवाद्याच्या हत्येसाठी भारत सरकारशी संबंध ताणल्याने, भारत सरकारनेदेखील कठोर पाऊल उचलण्यास सुऊवात केली.
यादरम्यान, कॅनडा सरकार एक बाब विसरले ते म्हणजे त्यांच्या भूमीचा दहशतवादी कारवायासाठी वापर होत असल्याचा. ती बाब भारत सरकारने वेळोवेळी निदर्शनास आणून दिली. मात्र जो झोपेचे सोंग घेतो, त्याला कोण जागे करणार अशी अवस्था कॅनडा सरकारची होती. मुळात संपलेल्या खलिस्तानवाद्यांचे लोण कसे पसरले याचा धावता आढावा घेतला तर 1990 चे दशक खूप महत्त्वाचे आहे. खलिस्तानवाद्यांचे सर्व दहशतवादी गजाआड झाले होते. अशावेळी पाकिस्तानी आयएसआयमध्ये मेजर या पदावर असलेल्या अमर खलिस्तानी याने लष्कर-ए-खालसा ही खलिस्तानवादी संघटना उभी केली. या संघटनेला पंजाबमध्ये फोफाविण्यासाठी आयएसआयने मदत घेतली ती लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख असलेल्या हाफीज सईद याची. तसेच या संघटनेसाठी बशीर अहमद पिर जो हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता तो देखील जोडला गेला. सय्यद सलाउद्दीनचा खास असलेला सय्यद रजा खान देखील लष्कर-ए-खालसासाठी काम कऊ लागला. हिजबुल मुजाहिद्दीनचा झवुर इब्राहीम मिस्त्राr याने देखील खलिस्तानी दहशत पसरविण्यास सुऊवात केली. देशात तसेच देशाबाहेर असलेल्या खलिस्तानवादी दहशतवाद्यांना पुरेसे पाठबळ देत यांनी पुन्हा दहशत माजविण्यास सुऊवात केली. नेमके अशावेळी पंजाब पोलिसांनी अमृतपालसिंग याला अटक केली.
अमृतपालकडे कसून चौकशी केली असता यामध्ये धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. अमृतपालला अमर खलिस्तानी याने दुबईला बोलावून त्याचे ब्रेनवॉश केले. त्यानंतर देशात पाठवून दहशत माजविण्यास सांगितले. तसेच देशात राहुन लष्कर-ए-खालसा या संघटनेचे नेतृत्व अमर खालिस्तानीचा उजवा हात असलेला हरविंदरसिंग रिंडा करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे, मलेशिया, थायलंड, इटली येथे राहुन काही खलिस्तानी दहशतवादी अमृतपालच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, रॉ ने परदेशात स्नॅचिंग ऑपरेशन राबवित थायलंडमधून कुलविंदरसिंग खानपुरिया याला भारतात आणले. यादरम्यान अमृतपाल आणि कुलविंदरसिंग यांची आमने-सामने चौकशी केल्यानंतर अनेक खलिस्तानवाद्यांची नावे समोर आली. त्यानुसार रॉ ने मलेशियामधून हरप्रीतसिंग हॅप्पी, इटलीमधून हॅप्पी संगेरिया यांना भारतात आणले. यावेळी यांच्या चौकशीत हे सर्व
ऑपरेशन पाकिस्तानमधून सुऊ असल्याची माहिती मिळाली. यावेळी रॉ ने तत्काळ कारवाई करीत पाकिस्तानातील आपल्या ऍसेटला (एजंट) आदेश देत कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार, गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानात बशीर अहमद पिर, सय्यद रजा खान, झवुर इब्राहीम मिस्त्राr यांचा मृत्यू झाला. हे नेमके कोणी केले? हे सांगण्याची आवश्यकता नाही, आपले वाचक सुज्ञ आहेत. तसेच पाकिस्तानात राहुन देशात खलिस्तानवाद्यांचे सायबर कॅम्पेनिंग करणारा परमजितसिंग पंजवार हा त्याच्या लाहोर येथील सनफ्लॉवर सोसायटीच्या आवारात मॉर्निंग वॉक करताना अचानक गायब झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. तसेच इंग्लंडमध्ये राहुन डबल लाईफ जगणारा अवतारसिंग खंडा हा तर शिरोमणी अकाली दलाचा सदस्य होता. याने लंडनमध्ये खलिस्तान टिव्ही सुऊ करीत भडकाउ भाषणे देण्यास सुऊवात केली होती. रॉच्या माहितीत हा आयएसआय आणि इंग्लंडच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याचे दुसरे नाव रणजोडसिंग उर्फ आझाद असे होते. मात्र याला काही दिवसांतच अन्नातून विषबाधा झाली. बर्मिंगहम येथे उपचार सुऊ असताना त्याचा देखील मृत्यू झाला. नेमके यादरम्यान, आयएसआएचा लेफ्टनंट कर्नल असलेल्या श]िहद मेहमुद चौधरी याने हरदिपसिंग निज्जर याला खलिस्तानी चळवळीसाठी तयार केले. यावेळी त्याला दुबईवऊन पाकिस्तान येथे प्रशिक्षण दिल्यानंतर दुबई व्हाया भारतात आणले. याठिकाणी आल्यानंतर पटियाला येथे असलेल्या स्वामी नारायण मंदीर परिसरात त्याने बॉम्बस्फोट घडवून आणले.
– अमोल राऊत








