पॅनडाच्या पंतप्रधानांना भारताविरोधात माहिती पुरवत असल्याचा कबुलीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि पॅनडामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावादरम्यान खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी थेट संबंध असल्याची कबुली दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपण ट्रूडो यांच्याशी थेट संपर्कात होतो. तसेच मीच कॅनडाला भारताविरोधातील माहिती पुरवल्यानंतर ट्रूडो यांनी कारवाई केली, असा दावा पन्नू याने केला आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या या कबुलीनाम्यामुळे भारत-कॅनडा यांच्यातील तणावाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्यावषी खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येप्रकरणी पॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर सोमवारी पॅनडाने सहा भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. याचदरम्यान, पॅनेडियन वाहिनी सीबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पन्नू याने ही कारवाई आपण पुरविलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आल्याचे सांगितले. आम्ही शीख गुरूंच्या आशीर्वादाने जीवनाच्या तत्त्वांचे पालन करतो. आपला जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी मृत्यूची तारीख लिहिली जाते, त्यामुळे मला भारताकडून येणाऱ्या हत्येच्या धमक्मया किंवा भारत सरकारकडून माझ्याविऊद्ध रचल्या जात असलेल्या हत्येच्या कट-कारस्थानांना मी घाबरत नाही, असेही पन्नू याने म्हटले आहे. तसेच मी जिवंत असलो तरच मी खलिस्तानी मोहीम राबवू शकेन. त्यामुळे मी स्वत:ला सुरक्षित ठेवता यावे आणि जगभरात खलिस्तानी मोहीम सुरू ठेवता यावी यासाठी मी सर्व सुरक्षा उपाय करत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. मुलाखतीमध्ये निज्जर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारत सरकारने एक समिती स्थापन केली आहे, असा प्रश्न पॅनडाच्या पत्रकाराने केला. यावर समिती हा केवळ दिखाऊपणा असल्याचे सांगितले.









