तीळ नंबर 17
उजव्या गालावर नंबर 16 च्या थोडे खाली उजव्या बाजूला त्या समान तीळ शरीराच्या डाव्या बाजूला कुल्हे बरगड्यांच्या मध्ये एखाद्या पुऊषाच्या या जागी तीळ असेल तर असा पुऊष मध्यमवर्गीय कुटुंबातील, त्याचे गुण अभिलाषा या ठरावीक व मर्यादित असतील. अशी व्यक्ती परदेशात एक सामान्य नोकरी व्यतीत करतो त्याचे जीवन चमक धमकपासून दूर असते, पण यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षाच्या आसपास ते अशा एखाद्या गोष्टीत अडकतात की एखाद्याला हानी पोहोचू शकतात किंवा मारण्याचा प्रयत्न करतात. भले त्यांच्या अंतरमनात तशी इच्छा नसेल तरी अशा व्यक्तीमध्ये खूप संघर्ष असतात. वेळेतच त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. स्त्रियांसाठी अशा जागी तीळ असेल तर अशा स्त्रिया हुशार बुद्धिमान शुद्ध विचाराच्या व आध्यात्मिक धार्मिक असतात. अशा स्त्रिया संसार मोहातून सावकाश बाहेर पडून जीवनाच्या उत्तरार्धात आध्यात्मिक मार्गावर जातात. त्यांचे राहणीमान विचारशीलता व त्याग समाजाला भावतो. सर्वजण तिला श्र्रद्धेने व प्रेमाने स्वीकारतात. असे लोक गुऊ व मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली येतात. कारण गुऊज्ञान विवेक व अध्यात्माकडे नेतो व मंगळ त्यांना ऊर्जा धाडस व संघर्ष करण्याची शक्ती देतो.
तीळ नंबर 18
उजव्या गालाच्या मध्यभागी तीळ असेल तर त्याच्या समान तीळ पोटावर असतो. ज्या पुऊषांना अशा विशेष जागी तीळ असेल तर ते मोठ्या आवाजात बोलणारे वाक्मयपट्टू आणि चतुर वक्ता त्यांचे शब्दच त्यांचे हत्यार असतात. आपल्या बोलण्यामुळे ते लोकांच्या मनात घर करतात. त्यांचा जन्म सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात होतो पण आपल्या कर्तृत्वाने राजकारणात व प्रेमसंबंधात ते असे कौशल्य दाखवतात की विवाहित स्त्रियांच्या प्रभावात येतात. याच संबंधाच्या माध्यमातून ते वैभव अधिकार आणि भोगविलास प्राप्त करतात. यांच्या जीवनात चविष्ट जेवणाला खूप महत्त्व आहे.
स्त्रियांसाठी : अशा स्त्रियांचे जीवन त्या बाहेरून अत्यंत आदरणीय शिष्टाचारी दाखवतात, पण आंतरिक स्वभाव अनेक समस्या आणि असंतुलित असते ही नैतिकदृष्ट्या कायम स्थिर नसते. निश्चित नसते आणि आश्चर्य म्हणजे यांच्या व्यवहार आणि दुखावली गेलेल्या जवळच्या व्यक्तीही त्यांच्यावर प्रेम करतात. यांच्या जीवनात सात अंकाचा विशेष प्रभाव राहतो. असे असू शकते की यांचा जन्म पण सात या तिथीशी संबंधित असेल. असा तीळ असणारी स्त्री पुऊष शनि व शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली येतात. शनि यांना गूढ रहस्य आणि कर्म-छाया देतो. शुक्र आकर्षण विलासितता समाजात प्रभावशाली बनवतो.
मेष
कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढलेली दिसेल. नवीन प्रकल्पांमध्ये सहभाग घ्याल. घरातील मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. प्रवासाचे योग संभवतात, मात्र खर्च वाढेल. आर्थिक क्षेत्रात थोडे सावध राहणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्मयता. मित्रमैत्रिणींकडून मदत मिळेल. आरोग्यात पचनसंस्थेच्या समस्या जाणवतील.
उपाय – मंगळवारी हनुमानजींना सिंदूर गूळ-भाकरीचा नैवेद्य द्या.
वृषभ
धनलाभाचे उत्तम योग आहेत. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील. नोकरीतील ताण काही प्रमाणात कमी होईल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल. नातेवाईकांकडून मदत मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. दात-दुखी/घशाचे त्रास संभवतात. नवा वाहन खरेदीचा विचार पूर्ण होईल. मुलांकडून अभिमान वाटेल अशी बातमी मिळेल.
उपाय – शुक्रवारी देवीला पांढरे फुल अर्पण करा व गरीबांना खीर-पुरी दान द्या
मिथुन
तुमच्या मेहनतीमुळे सुऊवातीस यश मिळेल. संवाद कौशल्य तुमचे हत्यार ठरेल. वरिष्ठ तुमच्या कार्यावर खूश होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश येईल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. नोकरीतील बदलाची शक्मयता आहे. आर्थिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. परंतु खर्च नियंत्रणात ठेवावा लागेल. प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. घरातील वडिलधाऱ्यांची तब्येत सांभाळावी.
उपाय -बुधवारी गणपतीला दूर्वा व मोदक अर्पण करा.
कर्क
आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. नोकरीत बढती अथवा सन्मानाचे योग आहेत. घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांसंबंधित काही चांगली बातमी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आई-वडिलांचा आशीर्वाद लाभेल. प्रवास यशस्वी होईल. प्रेमसंबंध विवाहात परिवर्तित होण्याची शक्मयता आहे. व्यवसायातील जुने प्रलंबित काम पूर्ण होतील. मात्र खर्च वाढलेला दिसेल. नवीन स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराचे योग आहेत. शत्रूंवर विजय मिळेल. .
उपाय – सोमवारी शिवलिंगावर दूध व बिल्वपत्र अर्पण करा.
सिंह
ताण वाढलेला दिसेल. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्मयता आहे. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक सावधपणे करा. कुटुंबातील वातावरण थोडे अस्थिर राहील. प्रिय व्यक्तीसोबत वाद टाळा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष होऊ नये. पचनसंस्थेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रवासात खर्च वाढेल. आठवड्याच्या मध्यावर काही चांगली संधी मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
उपाय – रविवारी सूर्याला जल अर्पण करा व तांबड्या वस्त्रांचा वापर करा.
कन्या
योजना यशस्वी ठरेल. कामकाजात नवे प्रकल्प मिळतील. वरिष्ठांची मदत होईल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर राहील. नोकरीतील बदलाच्या संधी मिळतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होईल. प्रवासातून नवीन ओळख होईल. घरात शुभकार्याचे वातावरण राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. आर्थिक क्षेत्रात धनलाभाचे योग आहेत. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
उपाय – बुधवारी तुलशीला पाणी द्या व हिरवा कपडा वापरा.
तुळ
सुऊवात आर्थिक अडचणींनी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत ताण वाढेल. वरिष्ठांसोबत वाद टाळा. व्यवसायातील अडथळे वाढतील. आरोग्यात त्रास संभवतो. रक्तदाब व श्वसनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात मतभेद वाढतील. प्रिय व्यक्तीशी गैरसमज निर्माण होण्याची शक्मयता आहे. प्रवास करताना दक्षता घ्या. मित्रांची मदत होईल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल.
उपाय- शुक्रवारी देवीला गुलाबाची फुले अर्पण करा.
वृश्चिक
परिश्र्रमांना फळ मिळेल. नोकरीत बढती किंवा कौतुक होईल. व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन प्रकल्प हाती घेण्यास योग्य वेळ आहे. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. वैवाहिक जीवन गोड राहील. प्रवास यशस्वी होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंधात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून मदत मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. धनलाभाचे योग आहेत. आठवड्याचा शेवट अत्यंत समाधानकारक राहील.
उपाय – मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा व गरीबांना लाडू दान करा.
धनु
मानसिक ताण वाढेल. नोकरीतील दडपण जाणवेल. व्यवसायातील प्रकल्प प्रलंबित राहतील. आर्थिक क्षेत्रात नुकसान होण्याची शक्मयता आहे. प्रवासात अडथळे येतील. प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज वाढतील. कुटुंबात तणाव निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत पचनाचे त्रास संभवतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रीत करता येणार नाही. आठवड्याच्या मध्यावर परिस्थितीत थोडी सुधारणा होईल.
उपाय – गुऊवारी भगवान विष्णूला पिवळे फूल व केळी अर्पण करा.
मकर
धनलाभाचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांकडून सुखद बातमी मिळेल. प्रवासातून फायदा होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंध विवाहात परिवर्तित होण्याची शक्मयता आहे. मित्रमैत्रिणींचा आधार लाभेल. घरात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. . जुनी कर्जे फेडली जातील. मानसिक समाधान राहील.
उपाय – शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करा व शनी मंदिरात तिळाचे तेल दान करा.
कुंभ
या आठवड्यात नोकरीत ताण वाढेल. वरिष्ठांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायातील जुने प्रकल्प प्रलंबित राहतील. आर्थिक क्षेत्रात अडचणी येतील. खर्च वाढेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्मयता आहे. प्रिय व्यक्तीशी संबंधात तणाव येईल. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी व ताणतणाव जाणवतील. प्रवास टाळावा. मित्रांकडून मदत मिळेल. आठवड्याच्या मध्यावर परिस्थितीत सुधारणा होईल.
उपाय – शनिवारी शनीदेवाला काळे तीळ व तेल अर्पण करा.
मीन
कामकाजात यश मिळेल. नोकरीतील वरिष्ठ आनंदी राहतील. व्यवसायात नवे करार होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसोबत नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासातून नवीन ओळख मिळेल. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. धनलाभाचे योग आहेत. घरात धार्मिक कार्याचे आयोजन होईल. समाजात सन्मान मिळेल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीची संधी मिळेल. .
उपाय – गुऊवारी श्रीविष्णूला तुळशीपत्र अर्पण करा व गरीबांना पिवळे कपडे द्या.









