तीळ नंबर 10 : डाव्या भुवईच्या कोपऱ्यापासून वरती नंबर नऊच्या डाव्या बाजूला असलेला तीळ, ज्याचा समांतर तीळ डाव्या हाताच्या मनगटाच्या वरती असा असतो ते धनवान, सुख भोगणारे, चिडखोर, कारण नसताना भांडणारे, शिव्या देणारे असतात. स्त्रियांमुळे बेचैन होणारा विषय वासनेतच जीवनसफल समजणारा असतो. स्त्रियांच्या बाबतीत असा तीळ कर्कश दृष्ट स्वभाव देतो. ज्यांच्या बरोबर हिचे संबंध येतील ते अप्रसन्नच राहतील. रोगामुळे पीडा भोगणारी आणि त्याच मानसिकतेत राहणारी, बायकांशी चांगले वागणारी अशी असते. शनी ग्रहाचा प्रभाव जास्त असतो.
तीळ नंबर 11 : डाव्या भुवईच्या थोड्या वरती दोन नंबर तिळाच्या डाव्या बाजूला त्यासमान तीळ डाव्या छातीच्या खाली असतो. पुऊषांसाठी : उतावळेपणामुळे मस्तिष्क-डोकेदुखी-टेंशनचा त्रास असतो. वडीलधाऱ्या लोकांशी अयोग्य व्यवहार करतात. व्यवसायात, व्यापारात स्वत:च्या कर्मामुळे दुर्भाग्यता, प्रत्येक कामात घाई गडबड, हलगर्जीपणा लापरवा प्रवृत्ती असते. वयाच्या 30 ते 40 व्या वर्षी स्वत: स्वत:वर आघात करून घेईल. नुकसान करून घेऊ शकतो. काही चुकांमुळे आरोप, लांछ्न भोगावे लागते. स्त्रियांसाठी : नासमजपणामुळे लहान वयातच विवाह होतो. त्यामुळे शारीरिक आणि आर्थिक कष्ट, पुऊष संतती जास्त.
तीळ नंबर 12 : डाव्या भुवईच्या शेवटी खालच्या बाजूला, त्यासमान तीळ डाव्या खांद्यावर असतो. पुऊषांसाठी : कुटुंबातील व्यक्तीमुळे, मित्रांमुळे नुकसान. व्याधीसहित अनेक दु:ख भोगणारा, स्वत: सर्व दृष्ट चाली जाणत असून देखील फसला जाणारा, स्त्राr संगतीमुळे बदनाम व धनहानी. स्त्रियांसाठी : अशा स्त्रियांपासून पुऊषांनी सांभाळून राहिले पाहिजे. विश्वासघातकी, गळ्याचा आजार, विजेपासून धोका. मंगळ व चंद्राचा प्रभाव जास्त असतो.
तीळ नंबर 13 : डाव्या भुवईच्या मध्यभागी त्यासमान तीळ डाव्या ढुंगणावर. ज्या स्त्रियांना या जागी तीळ आहे त्यांनी बारा नंबर तिळासाठी जे फलित आहे ते पाहणे. अशा जागी तीळ असणाऱ्या स्त्रियांचे जीवन व्यर्थ व आजाराने ग्रस्त असते. पुऊषांसाठी : कोर्ट कचेरी करण्यात दंग, कुटुंबीयांकडून शत्रुता त्यामुळे पुढे जाऊन हानी. उशिरा विवाह. आंतरजातीय विवाह झाल्यास हानी टळते. जिच्याशी विवाह होईल ती वयाने मोठी असेल. मंगळ व बुध ग्रहाचा प्रभाव जास्ती.
तीळ नंबर 14 : उजव्या भुवईच्या शेवटी कोपऱ्यात खाली. त्यासमान तीळ पोटाच्या डाव्या बाजूला असतो. ज्या पुऊषांना असा तीळ असतो तो साधारण भाग्यशाली पण अनेक प्रकाराच्या आजाराने ग्रस्त, खास करून हृदय आणि पचनक्रिया संबंधी वेळीच सावधानी ठेवून उपचार केल्याने फायदा होतो. परदेश यात्रेपासून सावधान, विशेष करून पूर्व दिशा. स्त्रियांसाठी : स्त्राr रोगांपासून सदैव दु:खी, अग्नी भय, पश्चिमी देशाच्या समुद्री यात्रेत अग्निभय. मंगळ व बुध ग्रहाचा प्रभाव असतो.
तीळ नंबर 15 : डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यात डाव्या भुवईच्या शेवटी तीळ नंबर बाराच्या खालच्या भागात. समान तीळ छातीच्या हाडांच्या ठीक खाली असतो. पुऊषांसाठी : अशा पुऊषांवर स्त्रिया खूप प्रेम करतात. त्या उलट तो त्यांच्याशी वाईट व्यवहार करतो. असा पुऊष सुंदर सुडौल शरीर व उंच असतो. त्याचा विवाह धनवान स्त्राrशी होतो पण थोड्या दिवसासाठी वियोग सहन करावा लागतो. स्त्रियांसाठी : गर्विष्ठ, इंद्रियांच्या स्वाधीन सुख उपभोग करण्यासाठी आसक्त त्यामुळे अधिक दुखी. ती मनुष्यापेक्षा प्राण्यांवर प्रेम करणारी असते. निडर मर्दानी कामे करणारीही असते.
तीळ नंबर 16 : उजव्या डोळ्याच्या ठीक खाली मध्यभागी समान तीळ हृदय स्थळाच्या खाली छातीच्या मध्यभागात. ज्या पुऊषांना या ठिकाणी तीळ असतो ते असभ्य, कठोर हृदयी, मानसिकतेमध्ये अस्थिर, जिद्दी, तर्कहीन, कुतर्क करणारे, लहानपणी उंचावरून पडल्यामुळे अपंगत्व असू शकते. शारीरिक बाधा. स्त्रियांसाठी अशा ठिकाणी तीळ असेल तर स्वभाव शांत व निवांत, दिनचर्या एकदम सावकाश संथगतीने, कशाही परिस्थितीत दिवस काढणारे, बांधा व पेहराव अव्यवस्थित, लहान वयातच वजन खूप जास्ती व बलवान, चविष्ट स्वयंपाक करणारी आई आणि वडिलांबद्दल श्र्रद्धा असणारी, दीर्घायु, जीवनात व्यर्थ व निष्फळ प्रयत्न करण्यात वेळ घालवणारे वृद्धापकाळ विदेशात घालवणारे. अशा लोकांवर मंगळ व बुध ग्रहांचा प्रभाव असतो. मंगळाचे तेज व बुधाची चंचलता यांच्या सकारात्मक व नकारात्मक दोन्ही ऊर्जेंनी प्रभावित असतात.
मेष
करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल व नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिकदृष्ट्या नवे मार्ग खुलतील, परंतु खर्चावर संयम ठेवणे गरजेचे आहे. व्यावसायिकांना मोठे सौदे मिळण्याची संधी असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याबाबत थकवा व डोकेदुखी त्रासदायक ठरू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित केले तर स्पर्धेत यश मिळेल.
उपाय – मंगळवारी मसूर दान करा.
वृषभ
नोकरीत कामाचे कौतुक होईल. व्यवसायात जुने प्रकल्प यशस्वी होतील. आर्थिकदृष्ट्या हळूहळू प्रगती होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम व सौख्य टिकेल. आरोग्य सुधारेल पण खाण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात सौहार्द राहील. विवाहितांना नात्यात समजूत ठेवावी लागेल. प्रवासाचा आनंद लाभेल. मित्रमंडळींशी संवाद वाढेल.
उपाय – शुक्रवारी सुगंधी वस्तू दान करा.
मिथुन
कामात विविधता दिसेल. नोकरीत नवे काम हाती येईल. व्यवसायिकांना प्रवासातून फायदा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आरोग्यासाठी ताण-तणाव टाळावा. विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम यश मिळेल. प्रेमसंबंध रोमांचक होतील. विवाहितांना एकमेकांची काळजी घ्यावी लागेल. प्रवास उपयुक्त ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
उपाय – बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा.
कर्क
स्थैर्य लाभेल. नोकरीत प्रगतीची संधी असेल. व्यवसायात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील, मात्र थोडा थकवा जाणवेल. विद्यार्थ्यांनी परिश्र्रम घेतल्यास यश निश्चित आहे. विवाहितांना परस्परांमध्ये गोडवा राहील. प्रवास उपयुक्त ठरेल. मित्रांचा आधार लाभेल. समाजात नाव वाढेल.
उपाय – सोमवारी शंकराला दूध अर्पण करा.
सिंह
जुन्या मित्रांच्या घरी जाणे होईल. एखाद्या शुभकार्याकरता नातेवाईकांचे आगमन होऊ शकते. हा आठवडा काहीसा बिझी असणार आहे. कामाचे प्रेशर आणि घरातील जबाबदाऱ्या यामुळे धावपळ होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्यायला लागेल. प्रवास करत असताना महत्त्वाच्या कागदपत्रांना जपून ठेवावे. वैवाहिक जोडीदाराशी शुल्लक कारणावरून मतभेद होऊ शकतात.
उपाय – गोड वस्तूचे दान करावे.
कन्या
नोकरीत वरिष्ठांचा त्रास असेल. व्यवसायिकांसाठी आर्थिक व्यवहार लाभदायक ठरतील. घरात शांतता राहील, पण नातेसंबंधात लहानसा वाद संभवतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या, पोटाचे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास केला तर यश निश्चित आहे. प्रेमसंबंधात गैरसमज दूर होतील. शत्रूंपासून सावध रहा. आध्यात्मिक चिंतन करा.
उपाय – हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा.
तूळ
नोकरीत बढतीची शक्मयता आहे. व्यवसायात जुने प्रकल्प यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात स्नेह व आनंद राहील. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. प्रेमसंबंध आनंददायी ठरतील. विवाहितांना कौटुंबिक आनंद लाभेल. प्रवास उपयुक्त ठरेल. मित्रांचा आधार मिळेल. समाजात सन्मान वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. आध्यात्मिकतेत रस वाढेल. आत्मविश्वास उंचावेल. नवीन संधींचा योग्य फायदा करून घ्या.
उपाय – साखरेचे दान करा.
वृश्चिक
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. त्यासाठी कठोर शारीरिक आणि मानसिक श्र्रम करणे आवश्यक आहे. पोटाचे दुखणे किंवा कंबरदुखी त्रास देऊ शकते. नोकरी-व्यवसायात पूर्ण मेहनत घेऊन केलेल्या कामात तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्या भौतिक सुखसोयी वाढतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुख-शांतीचा अभाव राहील. तुमचे विरोधक आणि शत्रूंवर तुमचा प्रभाव राहील. नको तो विचार करणे किंवा अति विचार करणे टाळावे.
उपाय – गंगाजल जवळ ठेवा.
धनु
अनपेक्षित संधी उपलब्ध होतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या व पदोन्नतीची शक्मयता आहे. व्यावसायिकांना परदेशी संपर्कातून नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात शांतता लाभेल. आरोग्य चांगले राहील, मात्र रक्तदाब व डोकेदुखीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मित्रांची मदत होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
उपाय – गुऊवारी पिवळे कपडे परिधान करा व गरिबांना हरभऱ्याची डाळ दान करा.
मकर
नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात जुने प्रकल्प यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र खर्चही वाढतील. घरगुती वातावरण आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विवाहित जीवन गोड राहील. प्रवासातून नवीन अनुभव मिळेल. मित्रांचा आधार लाभेल. शत्रूंच्या कारवाया निष्फळ ठरतील. समाजात नाव वाढेल.
उपाय – शनिवारी काळे उडद दान करा.
कुंभ
करिअरमध्ये सकारात्मक बदल संभवतात. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती बळकट होईल. घरगुती जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. विवाहित जीवनात समजूतदारपणा वाढेल. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रांकडून मदत मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घेऊन मानसिक शांती मिळेल.
उपाय – शनिवारी वृद्धांना पादत्राणे दान करा.
मीन
शांतता व स्थैर्य लाभेल. नोकरीत नवे प्रकल्प यशस्वी होतील. व्यवसायात उत्तम नफा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. घरात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना जिद्दीने अभ्यासात यश मिळेल. प्रेमसंबंध रोमांचक ठरतील. विवाहित जीवन आनंदी राहील. प्रवास उपयुक्त ठरेल. मित्रांचा आधार लाभेल. समाजात नाव वाढेल. शत्रूंचा पराभव होईल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात रस वाढेल.
उपाय – गुऊवारी विष्णूची पूजा करा व गरिबांना अन्नदान करा.





