तिलोत्तमा 5
तीळ नंबर तीन
: नंबर एकच्या ठीक वरच्या भागात मस्तकाच्या जवळचा तीळ ज्याचा समान तीळ उजव्या दंडाच्या किंवा कोपऱ्याजवळ ठीक खाली असतो.
ज्या पुरुषांच्या या स्थानावर मधाळ रंगाचा तीळ असेल तर असा पुऊष मिलिटरी/पोलीस खात्यात यशस्वी होतो. अधिकारी असतो. थोडी दादागिरी करणे यांच्या रक्तातच असते. त्याला चतुष्पात पशुपासून घोडदौड, गाय, म्हैस, उंट, हत्ती घोडे इत्यादींच्या व्यापारापासून आणि लॉटरी सट्टा/शेअर मार्केट वगैरेपासून लाभ होऊ शकतो. सोने, चांदी, लोखंड अशा धातूंच्या व्यवसायापासून धातू वितळवण्यापासून धातूंच्या खाणीपासून यांना चांगली सफलता मिळते. धातूशी संबंधित कार्यात याला गती असते. जर हा तीळ काळ्या रंगाचा असेल तर अशा व्यक्तीला पशूंपासून, न बघता बेफिकीर भरभर चालण्यापासून हानी होते/जखमा होतात. जर असा तीळ स्त्री जातकाला असेल तर अशा स्त्रियांच्या सुंदरतेत कमतरता असते पण सर्व कलांमध्ये कुशल असतात. तीव्र बुद्धी असते. साहित्यिक सभा जसे की नाटक, काव्य-रचना/कविता या प्रकारच्या व्यवसायापासून मानसन्मान प्राप्त होतो व धनप्राप्ती होते. अशी स्त्री सतेज असते पण दुसऱ्याच्या मनाला बोचेल असे बोलते. फटकळ असते. बोलताना मागेपुढे बघत नाही. अशा त्यांच्या स्वभावामुळे अशा स्त्रियांच्या मित्र-मैत्रिणी कमी व शत्रू जास्त असतात. अशा स्त्रियांनी सोळा नंबर तीळवाल्या पुऊषासोबत राहू नये कारण त्यांच्यासोबत राहिल्याने आर्थिक हानी आणि कोर्ट कचेरीपासून दु:ख भोगावे लागते. अशा स्त्री-पुऊषांवर गुऊ व शुक्राचा प्रभाव अधिक असतो.
तीळ नंबर 4
कपाळाच्या वरती उजव्या बाजूला तीन नंबर जवळ तर त्याच्या समान (जुळा) तीळ डाव्या बाजूला पाठीच्या कण्याच्या खाली मध्यभागी असतो. ज्या पुरुषांना हा तीळ मधाळ रंगाचा असतो त्याला आपल्या पित्याची संपत्ती मिळते. जमीन जुमला किंवा शेतीमधून धनलाभ होतो. पण भांडखोर स्वभावामुळे सर्व थरातील लोक त्यांना घृणा व हास्यास्पद नजरेने पाहतात. आयुष्याच्या मध्यावर किंवा शेवटी यांना नोकरी करावी लागते. पण या नोकरीमुळेच नंतर प्रसिद्धीचा योग प्राप्त होतो. अशी व्यक्ती क्रोधी, भांडखोर दंगा मारामारी करण्यातच खूश असते. हलक्मया कानाची व मन मानेल तसे जगणारी असते. जर हा तीळ काळ्या रंगाचा असेल तर जीवनाच्या शेवटीचे वीस वर्षे शारीरिक अस्वस्थता भोगावी लागते.
स्त्रियांच्या कपाळावर हाच तीळ असेल तर अशी स्त्री शुद्ध चित्त, समाजात मान, प्रतिष्ठा मिळविणारी असते. सहसा ही उदास राहते. विवाहानंतर जास्तीत जास्त विदेशात राहणारी, संतान नसणे किंवा संतान संबंधित समस्या असलेली असते. यांना चांगल्या (शुभ) कामासाठी मार्च महिना अशुभ तर एप्रिल व जुलै शुभ असतो. यांनी लाल व चित्रविचित्र रंगाचे जादूसमान प्रभाव करणारे किमती रत्न धारण करणे आवश्यक असते. (जसे फिरोझा). अशा स्त्री/पुऊषांवर शुक्र व शनी ग्रहांचा प्रभाव असतो.
तीळ नंबर 5
उजव्या भुवईच्या शेवटच्या कोपऱ्यात वरती कपाळामध्ये तीळ असेल तर त्याच्या समान तीळ पोटाच्या उजव्या भागात ठीक कमर आणि जांघेच्या मधोमध असतो. ज्या पुरुषांच्या या जागी मधाळ रंगाचा तीळ असेल तर उत्तम उच्च कुळातला पण धनसंपत्ती कमी, एकांतवास प्रिय, तत्त्व शास्त्राचा अभ्यासक समाजात मिक्स न होणारा आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात स्त्रियांच्या फसवणुकीमुळे त्यांची घृणा करणारा असतो. तोच तीळ जर काळ्या रंगाचा असेल तर काही विशेष महत्त्वाचा नसतो. जर हाच तीळ स्त्रियांच्या चेहऱ्यावर त्या जागी असेल तर अशी स्त्री खूप सुंदर पण विचार सुंदर नसणारी असते. कुटिल असते. मनाचा थांगपत्ता लागू न देणारी असते. तिचा विवाह तिच्यापेक्षा गरीब पुऊषाशी होतो. पण ती अनैतिक मार्गाने धन संचय करणारी, संतान सुख कमी असलेली असते. अशा स्त्रीचे शरीर नेहमी ताप आल्यासारखे गरम असते. जर आपल्या प्रकृतीची काळजी न घेतली तर कमी वयातच मृत्यूला सामोरे जावे लागते.
मेष
करिअरमध्ये प्रगतीची दारे खुली होतील. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आर्थिक क्षेत्रात काही अडचणी असल्या तरी हळूहळू परिस्थिती सुधारेल. कुटुंबात ऐक्मय आणि आनंद राहील. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा व डोकेदुखी जाणवेल. विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यास यश निश्चित आहे. नातेसंबंधात संवाद वाढवणे आवश्यक आहे. परदेश प्रवासाचे योग आहेत. घरात शुभकार्य ठरेल.
उपाय: मंगळवारी गूळ-चणे वाटा.
वृषभ
गुऊ व शुक्राच्या कृपेमुळे आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. नोकरीत बढती किंवा नवे संधी मिळतील. घरात शांतता राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ छान जाईल. आरोग्य सुधारेल, परंतु गोड पदार्थावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधात स्थैर्य मिळेल. विवाहितांना समाधान मिळेल. मित्रांचा आधार लाभेल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेवर भर द्यावा. प्रवास फायदेशीर होईल. धार्मिक स्थळी भेट द्याल.
उपाय: शुक्रवारी गायीला हिरवी चारा खाऊ घाला.
मिथुन
बुधाची कृपा राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य ओळखले जाईल. आर्थिक लाभ संभवतो. घरात सुसंवाद राहील. प्रवासातून फायदा होईल. आरोग्य उत्तम राहील, परंतु अनियमित आहार टाळावा. प्रेमसंबंधांना नवे वळण मिळेल. विद्यार्थ्यांना चांगली प्रगती होईल. मित्रांचा आधार मिळेल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळतील.
उपाय: बुधवारी तुळशीला पाणी घाला
कर्क
चंद्राच्या स्थितीमुळे भावनिक चढ-उतार संभवतात. घरात आई-वडिलांशी जवळीक वाढेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद टाळा. आरोग्यात थोडी अस्वस्थता जाणवेल, पचनाची काळजी घ्या. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज टाळा. विवाहितांना छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रवास अडथळ्यांचा ठरेल.
उपाय: सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा.
सिंह
सूर्याच्या प्रभावामुळे नेतृत्वगुण प्रकट होतील. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात मोठा लाभ मिळू शकतो. घरात उत्साहाचे वातावरण असेल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. विवाहितांना सुखद अनुभव येतील. प्रवास फायदेशीर ठरेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. परदेशातून लाभ मिळेल.
उपाय: रविवारी सूर्यनमस्कार करा.
कन्या
बुध ग्रह तुमच्या विचारशक्तीला बळ देईल. नोकरीत तुमच्या कल्पकतेचा फायदा होईल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर. आर्थिक क्षेत्रात लाभ संभवतो. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. विवाहितांना नात्यात आनंद लाभेल. मित्रांकडून प्रोत्साहन मिळेल. प्रवासातून फायदा. घरात शुभकार्य घडेल.
उपाय: बुधवारी हिरवे वस्त्र दान करा.
तुला
शुक्राच्या कृपेने सौख्य व आनंद मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा यशाचे संकेत. व्यवसायात आर्थिक लाभ. घरात स्त्री सदस्यांमुळे आनंद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. विवाहितांना नवे सुख मिळेल. प्रवासातून आनंद. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मित्रांचा सहवास लाभदायी. कला व सौंदर्याशी संबंधित कामात यश. परदेशी कामातून फायदा.
उपाय : शुक्रवारी देवी लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा.
वृश्चिक
मंगळाच्या प्रभावामुळे कार्यक्षेत्रात वेगाने प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात नवे उत्पन्नाचे स्रोत मिळतील. घरात थोडासा तणाव संभवतो. आरोग्यात थोडी थकवा व दुखणे जाणवेल. प्रेमसंबंधात मतभेद टाळा. विवाहितांना संयम बाळगावा लागेल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. प्रवासातून लाभ. मित्रांचा आधार मिळेल. नोकरीत बदल संभवतो. नवीन संपर्क लाभदायी.
उपाय: मंगळवारी लाल वस्त्र दान करा.
धनु
नोकरीत यश निश्चित आहे. आर्थिक क्षेत्रात सुधारणा. घरात धार्मिक कार्य संभवते. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल. प्रेमसंबंधात आनंद. विवाहितांना समाधान मिळेल. प्रवास शुभ. मित्रांचा आधार. परदेशी संपर्कातून लाभ. नवे प्रकल्प यशस्वी होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मालमत्ता संदर्भात फायदा. मानसिक समाधान लाभेल. भविष्यातील योजना पुढे सरकतील.
उपाय: गुरुवारी पिवळी फुले विष्णूला अर्पण करा.
मकर
शनीच्या प्रभावामुळे कार्यक्षेत्रात आव्हाने येतील, पण संयम बाळगल्यास यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात थोडा ताण संभवतो. घरात जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्यात हाडे व सांध्याचे दुखणे होऊ शकते. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात. विवाहितांना तणाव टाळावा लागेल. विद्यार्थ्यांनी कष्ट करणे आवश्यक. प्रवासात अडथळे. मित्रांकडून सहकार्य मर्यादित राहील.
उपाय: शनिवारी तीळ व तेल दान करा.
कुंभ
शनी व गुऊच्या प्रभावामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत प्रगती. व्यवसायात नवीन संधी. घरात शांतता राहील. आरोग्य सुधारेल. प्रेमसंबंधात गोडवा येईल. विवाहितांना आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. प्रवास लाभदायी. मित्रांचा आधार लाभेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. नवे संपर्क लाभदायी. धार्मिक कार्यात रस वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. भविष्य उज्ज्वल दिसेल.
उपाय: वृद्धांना अन्नदान करा.
मीन
गुऊ व चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक शांती लाभेल. नोकरीत यशाचे संकेत. व्यवसायात आर्थिक सुधारणा. घरात आनंदाचे वातावरण. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. विवाहितांना सुख मिळेल. विद्यार्थ्यांना यश निश्चित. प्रवास आनंददायी. मित्रांचा आधार. परदेशातून फायदा. धार्मिक कार्यात सहभाग. नवे प्रकल्प यशस्वी. मानसिक समाधान. सामाजिक सन्मान वाढेल.
उपाय: गुरुवारी गरीबांना पिवळे अन्न दान करा





