तिलोत्तमा – 4
नवी चेहऱ्यांवर असणाऱ्या तिळांबद्दल चर्चा चालू आहे. इथे एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत तुम्हाला सांगितला तो म्हणजे चेहऱ्यावर ज्या ठिकाणी तीळ असतो त्या तिळाचा समकक्ष तीळ शरीराच्या इतर अवयवावर असतो आणि एखाद्या चमत्काराप्रमाणे आपण ती जागा सांगू शकतो! इतकेच नाही तर त्याचे परिणाम काय असतील, हे देखील सांगू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा की, तिळाचे स्त्रियांच्या बाबतीत वेगळे फळ असते आणि पुऊषांच्या बाबतीत वेगळे फळ असते.
तीळ क्रमांक 1 : फोटोमध्ये एक नंबरचा तीळ पहा. चेहऱ्याच्या वरचा भाग म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधला वरचा भाग, कपाळाच्या बरोबर मध्ये तीळ असेल तर त्याच्यासारखाच त्याच्या उत्तरादाखलचा तीळ छातीच्या डाव्या बाजूला असतो आणि जर एखाद्या पुऊषाच्या दोन्ही भुवयांच्या मधल्या भागावरती कपाळाच्या मध्यभागावर जर मधाळ रंगाचा तीळ असेल तर अशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये धनसंपत्तीची अधिकारी असू शकते. ती जास्त करून ऐश्वर्यपूर्ण जीवन जगते. परंतु सावधानतेची आवश्यकता वयाच्या 35 ते 45 वर्षाच्या आयुष्याच्या मध्यावर घ्यावी लागते कारण या कालखंडात त्या व्यक्तीला आकस्मिक दुर्घटना किंवा गंभीर आजाराला सामोरे जावे लागते त्यामुळे शरीरातील कुठल्यातरी भागाची हानी होऊ शकते. तोच जर हा तीळ काळ्या रंगाचा असेल तर त्या पुऊषाच्या जीवनात यौवनकाळ चिंता, मानसिक तणाव व कष्ट यांनी भरलेला असतो. जीवनाच्या मध्यावर त्याला अनेक गंभीर आणि आव्हानात्मक संकटांचा सामना करावा लागतो. अशा पुऊषांना धैर्य आणि सतर्कता पूर्ण जीवन जगण्याचा सल्ला दिला जातो. स्त्राr जातकांसाठी असा तीळ असेल तर त्यांचे जीवन सुखमय जाते. त्या स्त्राrला आपल्या नात्यातल्या व्यक्तीकडून धनलाभ होतो त्यामुळे ती स्त्राr अधिक धनवान होऊ शकते. वयाच्या तिसाव्या वर्षी तिला पाण्यापासून धोका किंवा पाण्याशी संबंधित रोग होऊ शकतात. तो धोका टळला तर ती दीर्घायू असते.
तीळ क्रमांक 2 : दोन्ही भुवयांच्या वरती मध्यभागी तीळ असेल तर त्याच्यासारखा दुसरा तीळ म्हणजे जुळा तीळ उजव्या छातीवर असतो. ज्या पुऊषांना हा तीळ मधाच्या रंगाचा असतो असे पुऊष उच्च कुळात जन्म घेऊन अनेक शुभ व अशुभ गोष्टींचा अनुभव घेत दीर्घायुषी आयुष्य जगतात. तो साहित्य प्रेमी तसेच राजनीतिमध्ये उत्तम प्राविण्य व धार्मिक असतो. त्याच्यावर धर्माचा प्रभाव खूप जास्त असतो. तो चांगले कार्य करणारा व समाजात मान प्रतिष्ठा मिळवणारा, अन्यायाच्या विरोधात लढणारा गरिबांचा वाली व त्यांच्यासाठी संपत्ती सोडून जाणारा एक मोठा नेता असू शकतो. जर हाच तीळ काळ्या रंगाचा असेल तर वरील सर्व गोष्टींच्या उलट असेल!!! उगाचच खर्च करणारा, उधळ्या स्वभावाचा, गर्विष्ठ, निरर्थक खर्च करून आपली संपत्ती नष्ट करणारा, निरर्थक जीवन जगणारा असतो. सहसा जर चांगला आधार नसेल तर त्याचे म्हातारपण कष्टात व दीन-दु:खदायक आजाराने पीडित होऊन त्रासात मरतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे प्राचीन काळापासून आपला समाज पुऊषप्रधान होता, पुऊषांना जास्त प्राथमिकता दिली जायची. आपले वैदिक ज्योतिषशास्त्र पण पुऊषप्रधान संस्थेवरच अवलंबून आहे म्हणून हे तीळ रहस्य पण पुऊषांना समोर ठेवून रचण्यात आले. त्यावेळी जे मानण्यात आले होते ते अजूनपर्यंत तसेच चालत आले आहे म्हणून लेखकाने पुऊषांसाठी तिळाच्या दोन्ही रंगांचे वर्णन केले आहे आणि स्त्रियांसाठी दोन्हीचा समान अर्थ मानला आहे. स्त्रियांसाठी असाच तीळ असेल तर अशी स्त्राr गर्विष्ठ हलक्मया स्वभावाची कर्कशा असते. परंतु आपल्या मुलांसाठी एक चांगली आई असते. अशा स्त्रियांना कायम डोकेदुखीचा त्रास असतो. यांनी ज्वर प्रकोप व दूषित पाण्यापासून किंवा अशा स्थानापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरते. अशा स्त्रियांचा पहिला विवाह विजोड पुऊषाबरोबर होतो व हा विवाह कायद्याने मोडून घटस्फोट होऊन त्यानंतर त्यांचा पुनर्विवाह चांगल्या पुऊषांशी होतो, असे शास्त्र सांगते. माझा अनुभव 70ज्ञ् खरे असा आहे. असे तीळ असलेल्या स्त्रिया व पुरुष शुक्र आणि मंगळाच्या प्रभावाखाली असतात.
मेष :
कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल पण तुमची मेहनत यश देईल. आर्थिक गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल टाका. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तऊणांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. डोकेदुखीचा त्रास संभवतो. व्यावसायिकांना नफा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीची चिन्हे आहेत. प्रवास लाभदायी ठरेल
उपाय : गोड पदार्थ दान करा.
वृषभ :
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. व्यावसायिक जीवनात नवी योजना आखावी लागेल. जोडीदाराशी प्रेमळ वर्तन ठेवा. कामात दडपण वाढेल पण तुम्ही सहज निभावून न्याल. खर्च नियंत्रणात ठेवा. विद्यार्थ्यांनी परिश्र्रम करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. प्रवास टाळावा.
उपाय : गरिबांना दूध दान करा.
मिथुन :
संवाद कौशल्याने कामात यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात नवीन करार होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेकडे लक्ष द्यावे. प्रवासातून फायदा संभवतो. आरोग्यात सुधारणा होईल. मित्रांबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. नोकरीत वरिष्ठांचा आधार मिळेल. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प मिळतील. अचानक पैसा येईल.
उपाय : बुधवारी मूग दान करा.
कर्क :
कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढेल पण गुंतवणूक टाळावी. नोकरीत तणाव संभवतो. जोडीदाराचा आधार मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आळस टाळावा. मित्रांची मदत उपयुक्त ठरेल. प्रवासात खर्च वाढेल. भावंडांकडून साथ मिळेल. व्यावसायिकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे.
उपाय : सोमवारी गरिबांना भाकर-दूध वाटा.
सिंह:
आत्मविश्वास उंचावेल. व्यावसायिकांना चांगला नफा होईल. नोकरीत वरिष्ठांची मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आरोग्यात सुधारणा होईल. अचानक प्रवास संभवतो. शत्रू निष्प्रभ ठरतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
उपाय : रविवारी गोड खाऊ दान करा.
कन्या:
नोकरीत तणाव राहील. व्यावसायिकांनी संयम ठेवावा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. विद्यार्थ्यांनी परिश्र्रम वाढवावेत. पचनाशी निगडित समस्या संभवतात. प्रवासात त्रास होऊ शकतो. जोडीदाराशी गैरसमज होण्याची शक्मयता आहे. मित्रांशी संवाद वाढवा. वरिष्ठांशी सावधपणे वागा. शत्रूंवर मात कराल.
उपाय : बुधवारी गणेशजींना दूर्वा व मोदक अर्पण करा…
तुळ:
कामात यश मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. व्यावसायिकांना नवीन करार मिळतील. प्रवास फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. जोडीदाराचा आधार लाभेल. अचानक पैसा येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रांशी संबंध सुधारतील. धार्मिक कार्यात रस येईल.
उपाय : शुक्रवारी गरीब मुलींना वस्त्र दान करा.
वृश्चिक:
भावनिक ताण वाढू शकतो. नोकरीत दडपण राहील. व्यावसायिकांना नवीन आव्हाने येतील. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करा. कौटुंबिक वातावरणात तणाव संभवतो. विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत ठेवावे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा येईल. मित्रांचा आधार लाभेल. जोडीदाराशी संवाद वाढवा. प्रवास टाळावा. मालमत्ता विषयक वाद संभवतो.
उपाय : मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा.
धनु :
नोकरीत प्रगती होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. प्रवास लाभदायी ठरेल. आरोग्य चांगले राहील. जोडीदाराचा आधार मिळेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. मित्रांचा आधार लाभेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. उत्साह वाढेल.
उपाय : गुरुवारी विष्णूला पिवळी फुले अर्पण करा, गरिबांना केळी दान करा.
कुंभ :
नवीन कल्पना सुचतील. व्यावसायिकांना नफा मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्मयता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. प्रवास लाभदायी ठरेल आरोग्य चांगले राहील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. चिंता कमी होईल.
उपाय : शनिवारी गरिबांना काळे कपडे वा तिळाचे दान करा.
मीन :
कामात यश मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक आनंद वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यावसायिकांना नफा होईल. Aप्ड् प्रवास फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. जोडीदाराशी प्रेमळ नाते घट्ट होईल. मित्रांची मदत उपयुक्त ठरेल. धार्मिक कार्यात आनंद मिळेल. वरिष्ठांचा आधार मिळेल. अचानक पैसा येईल.
उपाय : गुरुवारी गरिबांना गोड पदार्थ वाटा.





