प्रतिनिधी / बेळगाव
एक–दीड वर्षापूर्वी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून बेपत्ता झालेल्या दोघा जणांचा अद्याप शोध लागला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत.
सदाशिवनगर येथील अश्पाक अब्दुलकरीम शेख (वय 42) हा युवक 12 जून 2023 च्या सायंकाळी 5 वाजता मारुती गल्ली येथून बेपत्ता झाला आहे. त्याच्या वडिलांनी 17 जून रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून अद्याप त्याचा शोध लागला नाही.
न्यू गुड्सशेड रोड येथील नितीन प्रताप फलारी (वय 44) हा 2 मे 2022 पासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी 2 जानेवारी 2023 रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात नितीनच्या आईने फिर्याद दिली होती. अद्याप त्याचा शोध लागला नाही. या दोघा जणांविषयी कोणाला माहिती असल्यास 9480804050 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









