वार्ताहर/किणये
सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत ब्रह्मलिंग शिक्षण प्रसारक मंडळचे संचलित खादरवाडी स्कूलच्या विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे.मुलींच्या कुस्तीमध्ये 48 किलो वजनी गटात खुशी पाटील प्रथम तर 30 किलो वजनी गटात श्रृती शिवनगेकरने प्रथम व शाळेच्या मुलींच्या रिले संघाने प्रथम क्रमांक पटकविले. क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडू मुलींना निवृत्त सुभेदार अशोक डोळेकर यांच्यावतीने मोफत स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आले आहे. या विद्यार्थिनीने क्रीडा शिक्षक जी. व्ही. गुरव, अमित बिर्जे, मुख्याध्यापक व सहशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.









