वार्ताहर/किणये
खादरवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या मच्छे विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये सांघिक खेळामध्ये मुलांच्या खो-खो संघाने प्रथम व व्हॉलीबॉल संघाने द्वितीय. मुलींच्या संघाने खो-खो व थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये मुलींमध्ये स्वप्नालीने 1500 मी प्रथम, वैष्णवी वेंगुर्लेकर 3000 मी तृतीय, दिपा पाटील 1500 मी धावणे तृतीय,दूर्वा पाटील 400 मी अडथळा प्रथम, स्वप्नाली धामणेकर 3000 मी धावणे प्रथम, मनाली धामणेकर 3000 मी धावणे द्वितीय, अक्षरा नेसरकर 400 मी धावणे द्वितीय, श्रावणी पाटील 800 मी धावणे प्रथम, दीपा पाटील द्वितीय, 400 बाय 100 मीटर रिले प्रथम क्रमांक,अक्षरा नेसरकर 200 मी धावणे प्रथम, श्रावणी पाटील तृतीय, समीक्षा मालोजी भालाफेक तृतीय, खुशी पाटील हातोडाफेक तृतीय, गोळाफेक,थालीफेक प्रथम व प्रांजल पाटील द्वितीय,समीक्षा मालोजीने तृतीय क्रमांक मिळविला. अडथळा शर्यतीमध्ये किशोर पाटील प्रथम, राहुल माळवी द्वितीय संकल्प पाटील तृतीय, व गोळाफेक द्वितीय, योगेश बस्तवाडकर पाच किलोमीटर चालणे तृतीय, साईनाथ पाटील 3000 मी धावणे द्वितीय, 400 बाय 100 मी रीले द्वितीय, गुरुनाथ पाटील 1500, मी धावणे प्रथम या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जी. व्ही गुरव ,अमित बिर्जे, मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन व प्रोत्सान मिळात आहे.









