वार्ताहर / खडकलाट
येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री वाशिखान देवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरी करण्यात आली. यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते. 11 रोजी सायंकाळी विविध गावाहून आलेल्या ढोल वादकांचे आगमन झाले. रात्री श्री वाशिखान देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा पालखी मंदिरात आल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 12 रोजी पहाटे देवास महाभिषेक घालण्यात आला. सकाळी 10 वाजता विविध ठिकाणाहून आणण्यात आलेल्या दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सायंकाळी 4 वाजता वाशीचे पुजारी भागोजी पुजारी यांच्या कडून श्रीची वाणी (भाकणूक) पार पडली. सायंकाळी 6 वाजता भंडाराची उधळण करण्यात आली.
ढोल वादन करताना वाशिखान देवाच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी फटाक्मयांची आतशबाजी करण्यात आली. रात्री 8 वाजता महाप्रसादाचे वाटप झाले. रात्री 10 पासून धनगरी गायनाच्या जुगलबंदी कार्यक्रम पार पडला. 13 रोजी सकाळी कर तोडून यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी पुजारी, आवडखान, कोडे, करगार व भिंगरे या पाच समुदयाचे नागरिक, महिला, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









