बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स व कंग्राळ गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने,एसपी ऑटो अॅक्सेसरीज पुरस्कृत 47 वि. श्री गणेश चषक सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धाला मोठ्या उत्साहात प्रांरभ झाला. सरदार मैदानावर उद्घाटन प्रंसगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी माहापौर जेष्ट क्रिकेटपटू मालोजी आष्टेकर, पुरस्कृत शरद पाटील,सुहास पाटील,गंगाधर पाटील, गजानान बडवण्णाचे,बाबुराव कुट्रे,पंकज पाटील यांच्या उपस्थितीत यष्टीरक्षण, एसटीचे, पूजन करून स्पर्धेचे 47 वे सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण 64 स्पर्धेकांनी भाग घेतला होता, या स्पर्धेसाठी विजेत्या व उपविजेता रोख रक्कम व चषक त्याचप्रमाणे उत्कृष्ट यष्टीरक्षक,उत्कृष्ट फलंदाज,अशी वैयक्तिक बक्षिसे आहेत. यावेळी बोलताना माजी माहापौर म्हणाले की बेळगावत होणाऱ्या केजीबी स्पोर्ट्सची ही स्पर्धा मागिल काही वर्षा पासून भरविले जाते,या स्पर्धेत अनेक युवावर्ग भाग घेतात व नवे खेळाडू बनतात, हि स्पर्धा युवा वर्गने कायम टिकून ठेवली पाहिजे त्यासाठी आम्ही कायम पुरस्कृतना स्पर्धेत भाग घेऊन सहकार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.या वेळी कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ, गणेशोत्सव मंडळ, केजी स्पोर्ट्सचे संस्थापक पदाधिकारी व माजी खेळाडू तसेच एसपी कार अॅक्सेसरीजचे संचालक उपस्थितीत होते.









