वृत्तसंस्था/ रियाद
2025 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धेत शनिवारी पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ केला.
या सामन्यात स्वायटेकने किजचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. विम्बल्डन विजेती स्वायटेकला हा सामना जिंकण्यासाठी तासभर झगडावे लागले. दुसऱ्या एका सामन्यात रायबाकिनाने अॅनिसिमोव्हाचा 6-3, 6-1 अशा सेट्समध्ये फडशा पाडला. 5.235 दक्षलक्ष अमेरिकन डॉलर्सचे पहिले बक्षिस या स्पर्धेतील विजेतीला मिळणार आहे. अमेरिकेची कोको गॉफ ही या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे.









