मुंबई
केन्स टेक्नॉलॉजी कंपनीचा समभाग शेअरबाजारात शुक्रवारी शेवटच्या दिवशी चांगलीच उसळी घेताना दिसला. कंपनीने कर्नाटक राज्यात 3750 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले असून त्याचे परिणाम समभागावर सकारात्मक दिसले. कंपनीचा समभाग 14 टक्के इतका उसळत 2122 रुपयांवर पोहचत विक्रमी स्तरावर बीएसईवर कार्यरत होता. सेमीकंडक्टर असेम्बलीसंदर्भात केन्सने कर्नाटक सरकारबरोबर सहकार्याचा करार केला आहे.









