अमेरिकेच्या संसदेतील घटना : रिपब्लिकन खासदारांकडून विरोधात मतदान
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले आहे. सत्तारुढ डेमोक्रेटिक पार्टीच्या 208 खासदारांसह रिपब्लिकन पार्टीच्या 8 खासदारांना मॅक्कार्थी यांच्या विरोधात मतदान केले आहे. रिपब्लिक पार्टीच्या उर्वरित 210 खासदारांनी मॅक्कार्थी यांच्या बाजूने मतदान केले होते. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तारुढ पक्षाने हाउस स्पीकरच्या विरोधात मतदान करून त्यांना पदावरून हटविले आहे. पद गमवावे लागल्यावर मॅक्कार्थी यांनी पुन्हा या पदासाठी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.

अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाचे सभापतिपद सुमारे आठवडाभर रिक्त राहणार आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते 10 ऑक्टोबर रोजी एकत्र येत सभापतिपदाच्या उमेदवारावर चर्चा करणार आहेत. यानंतर 11 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तोपर्यंत नॉर्थ कॅरोलिनाचे पॅट्रिक मॅकहेन्री हे अंतरिम सभापती असणार आहेत. मॅकहेन्री हे मॅक्कार्थी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
पदावरून का हटविण्यात आले?
अमेरिकेत शटडाउन टाळण्यासाठी फंडिंग विधेयक आणले गेले होते. प्रतिनिधिगृहात हे विधेयक संमत करविण्यात मॅक्कार्थी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे मॅट गेट्ज यांच्यासह काही रिपब्लिकन खासदार त्यांच्यावर नाराज होते. यामुळे त्यांनी स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याविरोधात प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला. मॅक्कार्थी हे रिपब्लिकन पार्टीचे नेते आहेत. अशा स्थितीत सत्तारुढ पक्षाने त्यांना पदावरून हटविण्याची संधी पाहून मॅक्कार्थी यांच्या विरोधात मतदान केले.
शटडाउन रोखण्यासाठी कालमर्यादा
सभापतींचे पद रिक्त झाल्याने अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाचे कामकाज स्थगित झाले आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या काँग्रेसने फंडिंग न वाढविल्यास 17 नोव्हेंबर रोजी सरकारी शटडाउनसाठीची कालमर्यादा समाप्त होणार आहे. मॅक्कार्थी यांची सभापती पदी जानेवारी महिन्यात निवड झाली होती.









