सावंतवाडी । प्रतिनिधी
नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2024 साठी फॉरेन्सिक ऑडोन्टोलॉजी आणि अनुप्रयुक्त न्यायशास्त्र क्षेत्रातील फेलोशिप प्रोग्राम पूर्ण केलेल्या केतकी उमेश चव्हाण यांना फेलोशिप प्रमाणपत्र प्रदान केले.विद्यापीठाच्या कुलपती, उपकुलपती आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांच्या शिफारशीने आणि शैक्षणिक परिषदेच्या शिफारशीवर आधारित या प्रमाणपत्र प्रदानाचा समारंभ नुकताच झाला .केतकी चव्हाण यांनी या फेलोशिप कार्यक्रमासाठी सर्व आवश्यक निकष पूर्ण केले आहे . केतकी चव्हाण या मूळ कुडाळ शहरातील रहिवासी असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .









