ओटवणे| प्रतिनिधी
सह्याद्री पट्ट्यातील जागृत देवस्थान असलेल्या केसरी येथील श्री देव स्वयंभू देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव अर्थात त्रिपुरारी उत्सव बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. केसरीसह देवसू आणि दाणोली या तीन गावांचा अधिपती असलेल्या स्वयंभूच्या दर्शनासाठी या दिवशी गोवा, कोल्हापूरसह जिल्ह्यातील भाविकांची गर्दी होणार आहे.देवसू, दाणोली व केसरी या तीन गावचे एकत्रित हे स्वयंभू देवस्थान आहे. श्री देव स्वयंभू मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला सायंकाळी उशिरा शेकडो पणत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी उत्सव साजरा केला जातो. तसेच धार्मिक विधींनी सूर्यास्ताच्या वेळी केले जाणारी देवाची आरती आगळी वेगळी व वैशिष्टपुर्ण असते.भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.









