मुंबई
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आज (दि. २२) रोजी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयचा आगामी चित्रपट ‘केसरी २’ हा १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमामध्ये आर. माधवन आणि अनन्या पांडे ही दिसणार आहेत. हा सिनेमा २०१९ मध्ये आलेल्या ‘केसरी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. ‘केसरी २’ चा टिझर २४ मार्च २०२५ रोजी रिलीज होईल असेही, अक्षय कुमारने सांगितले.









