क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
आंतर राज्य टी-20 क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या लीग सामन्यातही पराभव स्वीकाराला लागल्याने गोव्याचे आव्हान संपुष्टात आले. पुदूचेरीतील सीचॅम कॅप मैदानावर खेळविण्यात आलेल्या या लढतीत केरळने गोव्याचा 25 धावानी पराभव केला.

केरळने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 8 बाद 226 धावा चोपल्या. त्यांच्या वरुण नयनारने 43 चेंडूत 8 चौकार व 5 षटकारांनी 83, सलमान निझारने 41 तर अब्दुल बाझिथने 10 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार हाणून 29 धावा केल्या. गोव्यासाठी फॅलिक्स आलेमाव, वीजेश प्रभुदेसाई व शुभम देसाईने प्रत्येकी 2 तर दर्शन मिसाळ व सुयश प्रभुदेसाईने प्रत्येकी एक गडी बाद केला.
उत्तरादाखल, गोव्याने 20 षटकात 9 बाद 201 धावापर्यंत मजल मारली. गोव्यासाठी सुयश प्रभुदेसाईने 42 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांनी 53, स्नेहल कवठणकरने 25 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांनी 41, इशान गडेकरने 24 चेंडूत 6 चौकार व एक षटकाराने 37 तर दर्शन मिसाळने 13 चेंडूत 4 चौकार व एक षटकाराने नाबाद 27 धावा केल्या. केरळसाठी पी. के. मिधूनने 3, बासिल थंपी व मोहम्मद इन्नानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: केरळ, 20 षटकात 8 बाद 226 (मोहम्मद अझहर 19, वरुण नयनार 83, जलज सक्सेना 17, सलमान निझ्‰र 41, अब्दुल बाजित 29, शरफउद्दीन 12 धावा. फॅलिक्स आलेमाव 3-0-42-2, वीजेश प्रभुदेसाई 3-0-40-2, दर्शन मिसाळ 4-0-37-1, शुभम देसाई 4-0-31-2, अंकीत सिंग 3-0-50-0, सुयश प्रभुदेसाई 3-0-24-1) विजयी विरूद्ध गोवा, 20 षटकात 9 बाद 201 (इशान गडेकर 37, राहुल त्रिपाठी 4, सुयश प्रभुदेसाई 54, स्नेहल कवठणकर 41, तुनीश सावकार 2, कश्यप बखले 5, अंकीत सिंग 0, राजशेखर हरिकांत 19, दर्शन मिसाळ नाबाद 27, शुभम देसाई 1, फॅलिक्स आलेमाव नाबाद 1 धाव. पी. के. मिधून 4-0-40-3 मोहम्मद इन्नान 3-0-34-2, बासिल थंपी 3-0-34-2, मनूकृष्णन 3-0-27-1).









