परळी: चार दिवसापूर्वी केळवली धबधब्यात पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेला राहुल माने (वय 18) याचा मृतदेह आज सापडला. शुक्रवार पासून पोलीस यंत्रणा, शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमने अविरतपणे शोधकाम सुरु ठेवले होते. मात्र वरुन कोसळणारा धबधबा व मोठ मोठाल्या दगडी यामुळे शोधकार्य करण्यास अडथळा येत होता. अखेर आज त्याचा मृतदेह सापडला. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास धबधबा परिसरात केळवलीच्या पोलीस पाटलांसह काही ग्रामस्थ शोध घेत होते. यावेळी धबधब्या पासून सुमारे सत्तर फूट अंतरावर बेपत्ता युवकाचा मृतदेह दगडा जवळ दिसला यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
केळवली (ता.सातारा) येथील धबधबा परिसरात सातारा (विकासनगर) राहुल माने (वय 18) व त्याचे मित्र हे शुक्रवारी (ता. २२) रोजी पाणी पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहण्याचा मोह न अवरल्याने राहुल देखील मित्रांसमवेत केळवली धबधब्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, यश आले नाही. त्यानंतर ही मुले साताऱ्याला निघुन आली. कुटुंबियांना घटना समजताच त्यांनी पोलिसांना कळवले.शुक्रवारी शोध मोहिम घेणे शक्य नसल्याने शनिवार पासून धबधबा परिसरात श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधकार्य अविरत पणे सुरू ठेवले. पाण्याच्या प्रवाहामुळे शोध घेण्यास अडचण येत होती.
.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









