वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 22 सप्टेंबर रोजी जंतर-मंतर येथे ‘जनता की अदालत’ कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. राज्य समन्वयक गोपाल राय यांनी दिल्लीत विभागीय प्रभारींच्या बैठकीत ही माहिती दिली. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात 13 सप्टेंबर रोजी जामिनावर तुऊंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री आतिशी आज शनिवार, 21 सप्टेंबर रोजी पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केजरीवालांची ‘जनता की अदालत’ होणार आहे. या सभेमध्ये केजरीवाल काय बोलतात याकडे आप कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.









