Kidney Health : हाई ब्लड प्रेशर आणि हाइपरटेंशन हा एक असा आजार आहे जो झपाट्याने पसरत आहे. हा आजार देखील चिंतेचा विषय बनू शकतो, कारण त्याची लक्षणे दीर्घकाळानंतर दिसून येतात. उच्च रक्तदाबामुळे शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होत असते.उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका,स्ट्रोक किंवा किडनी निकामी होण्यासारख्या अनेक आरोग्य समस्यांचा धोका होवू शकतो.
रक्तवाहिन्यांच्या मदतीने किडनी आपल्या रक्तातील अतिरिक्त द्रव आणि विषारी पदार्थ शरीरातून काढून बाहेर टाकते. हाई ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबासोबत मधुमेहाची समस्या असेल तर तो आणखी जोखीम गाठू शकतो.उच्च रक्तदाबामध्ये किडनीभोवतीच्या धमन्या अरुंद होतात किंवा कमकुवत होतात.त्यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही.या कारणामुळे किडनी नीट काम करू शकत नाही.
रक्त फिल्टर करण्यात अडचणी येऊ शकतात
किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचा टिश्यू आढळतो, जो रक्त फिल्टर करण्याचे काम करतो. जेव्हा मूत्रपिंडाशी संबंधित धमन्या खराब होतात, तेव्हा नेफ्रॉनला ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाहीत. ज्यामुळे ते काम करू शकत नाही. परिणामी मूत्रपिंड शरीरातील घाण आणि हानिकारक घटक गाळून काढून टाकू शकत नाही.
उच्च रक्तदाब कसा कमी करायचा
शरीराचे वजन संतुलित करा.
धूम्रपान करू नका.
अल्कोहोल किंवा कॅफिनचे जास्त सेवन करू नका.
भरपूर झोप घ्या.
तणावमुक्त रहा.
साखर,सोडियम, प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.
दररोज व्यायाम करा.
तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बीपी नियंत्रणाचे औषध घेऊ शकता.
Disclaimer: वरील दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणे हा आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









