मुंबई
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार निशाणा साधला आहे. गंभीरला माध्यमांशी बोलण्याचा शिष्टाचार नसल्याचे मांजरेकर म्हणाले. सोशल मीडियावर तिखट शब्दात लिहिलेल्या एका पोस्टमध्ये मांजरेकर यांनी बीसीसीआयकडे गंभीरला पत्रकार परिषदांपासून दूर ठेवण्याची विनंती केली. मी नुकतेच गंभीरला पत्रकार परिषदेत पाहिले. त्याला अशा कामापासून दूर ठेवणे आणि पडद्यमागे काम करू देणे हेच बीसीसीआयसाठी शहाणपणाचे ठरेल. त्याची बोलण्याची पद्धत आणि शब्द योग्य नाहीत. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यासाठी योग्य आहेत, अशी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे.









