प्रतिनिधी /पर्वरी
साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक यांची गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बंड करून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली होती. पण आमदार नाईक हे मूळ भाजपचे कार्यकर्ते होते. त्यानी या मतदारसंघात भाजपचे युवा अध्यक्ष तसेच अन्य जबाबादऱ्या सांभाळल्या होत्या. तसेच केदार नाईक भाजपच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांचे भाजप पक्षाच्या ध्येय धोरणाशी मिळते जुळते आचरण आहे. पक्षाने त्यांच्यावर गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकल्याने कार्यकर्त्यांना उत्साह झाला आहे.









