मुंबई
कामाचे कंत्राट मिळालेल्या केईसी इंटरनॅशनल या कंपनीचा समभाग बुधवारी शेअरबाजारात उसळी घेताना पाहायला मिळाला. सदरचा कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 11 टक्के इतका वाढत 739 रुपयांवर पोहचला होता. भारतातील एफएमसीजी व डाटा सेंटरसंबंधीत नव्या क्लायंटकडून केईसीला 1012 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. आतापर्यंत पाहता कंपनीकडे एकूण 6500 कोटी रुपयांची कामे कंत्राटासाठी मिळाली आहेत.









