नवी दिल्ली : प्रतिनिधी
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव चंदीगडमध्ये शेती कायद्यांविरोधात देशव्यापी आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर प़िडीतांना प्रत्येकी 3 लाख रुपये मदत देणार आहेत. राव यांनी काल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली.
के. चंद्रशेखर राव यांच्या चंदीगड भेटीच्या एक दिवस आधी पंजाबचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री विजय सिंगला यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या पाच कुटुंबांना ₹ 25 लाखांची भरपाई दिली.
दरम्यान, तेलंगणा काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केसीआर यांचा हा निर्णय दुटप्पीपणाचा असल्याचा आरोप केला. तेलंगणा काँग्रेसचे प्रवक्ते दासोजू श्रवण म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील 8000 हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे डोळेझाक केली आहे. जर शेतकर्यांची एवढीच काळजी होती, तर केंद्राने यापूर्वी आणलेल्या शेती कायद्याचे समर्थन मुख्यमंत्र्यांनी का केले”