दिवाळीनंतर जाहीरसभांचा धडाका
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 13-28 नोव्हेंबर या कालावधीत 54 प्रजा आशीर्वाद रॅलींना संबोधित करणार आहेत. केसीआर यांनी रविवारपासून 9 नोव्हेंबरपर्यंत 12 मतदारसंघांच्या दौऱ्यांना प्रारंभ केला आहे. तर दिवाळीनंतर केसीआर 18 नोव्हेंबरपासून पुन्हा दौऱ्यांना प्रारंभ करणार आहेत.
बीआरएस प्रमुख 28 नोव्हेंबर रोजी गजवेल मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. तर 9 नोव्हेंबर रोजी गजवेल आणि कामारे•ाr दोन्ही मतदारसंघांमध्ये स्वत:चा अर्ज भरणार आहेत. केसीआर यांनी आतापर्यंत 42 जाहीर सभांना संबोधित केले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शनिवारी कोन्यापल्ली येथे भगवान श्रीवेंकटेश्वम स्वामींचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री केसीआर यांचे मंदिराच्या पुजाऱ्यांनी पूर्णकुंभसोबत स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम मंदिराला प्रदक्षिणा घालत ध्वजदंड बांधून मंदिरात प्रवेश केला. तसेच स्वत:चे उमेदवारी अर्ज मंदिराच्या पुजाऱ्यांसमोर सादर केले. हे दस्तऐवज मूलविरट्टूमध्ये ठेवण्यात आले आणि मुख्यमंत्री केसीआर यांचे गोत्र, नाव आणि संकल्पासोबत पूजा करण्यात आली.









