नवी दिल्ली :
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळ्यातील संशयित बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवार, 12 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. कविता यांनी सीबीआय आणि ईडी प्रकरणात जामीन अर्ज फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या के चंद्रशेखर राव यांची कन्या असलेल्या कविता यांना ईडीने 15 मार्च 2023 रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील निवासातून अटक केली होती. अटकेनंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी प्रयत्न केला असला तरी त्यांना अद्याप दिलासा मिळू शकलेला नाही.









