अॅड. रमाकांत खलप यांची माहिती
पणजी : कोकण मराठी परिषद गोवा, गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 19 रोजी कवी कालिदास पुरस्कार वितरण सोहळा सायं. 4 वा. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. संभाजीराव मोहिते आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद काळे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चित्रसेन शबाब यांना कवी कालिदास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती कोकण मराठी परिषदेच्या सल्लागार समितीचे अॅड. रमाकांत खलप यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कोकण मराठी परिषदेचे खजिनदार अजित नार्वेकर, अध्यक्ष सागर जावडेकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, कोमपच्या सचिव चित्रा क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष प्रा. नारायण महाले, प्रकाश तळवडेकर उपस्थित होते. आतापर्यंत एकूण 16 जणांना कवी कालिदास पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गजानन रायकर, गोपाळराव मयेकर, पद्मश्री विनायक खेडेकर, विष्णू वाघ, सुरेश वाळवे, सोमनाथ कोमरपंत यांना प्रदान करण्यात आला आहे. यंदा चित्रसेन शबाब यांना कवी कालिदास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे अॅड. खलप यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्यानंतर आषाढस्ये प्रथम दिवसे यावर कवीसंमेलन होणार असून या कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून चित्रसेन शबाब असणार आहेत. या कविसंमेलनात लक्ष्मण पित्रे, दयाराम पाडलोस्कर, स्वप्ना धुपकर, अंजली चितळे, सचिन मणेरीकर, राजमोहन शेट्यो, सुनेत्रा कळंगूटकर, गौरी भालचंद्र, तृप्ती बांदेकर, डॉ. शिल्पा डुबळे परब, श्रद्धा गवंडी, माधुरी शेटकर, प्रमोद कारापूरकर, प्रकाश क्षीरसागर, कालिका बापट, श्रमी कामत, सृष्टी नाईक, कविता आमोणकर, पौर्णिमा देसाई, गुलाब वेर्णेकर, शीला कोळंबकर, चित्रा क्षीरसागर, आसावरी कुलकर्णी, रजनी रायकर, सविता सामंत, समृद्धी केरकर, इंदू परब, संदीप मणेरीकर, लक्ष्मी महात्मे, प्राप्ती गावकर, आकांक्षा नाईक, दीपा मिरींगकर, शर्मिला प्रभू, विश्वनाथ जोशी, प्रकाश तळावडेकर हे कविसंमेलनात कविता सादर करतील.









