ओटवणे । प्रतिनिधी
ओटवणे मांडवफातरवाडी येथील रहिवाशी कौशल्या दशरथ पनासे (८३) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते तथा गवंडी कारागीर महादेव पनासे तसेच लक्ष्मण पनासे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.









