मुंबई

‘आई कुठं काय करते’ फेम आरोही म्हणजेच कौमुदी वलोकरचं शुभमंगल सावधान दिमाखात साजरे झाले. तिच्या लग्नसोहळ्याचे खास क्षण तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

” साथ सात जन्माची” अशी कॅप्शन देत कौमुदीने लग्नाचे खास क्षण शेअर केले. ‘आई कुठं काय करते’ मालिकेनंतरच कौमुदीची लगीनघाई सुरु झाली होती.

तिने लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमातील केळवणं, मुहुर्तमेढ असे सगळे खास क्षण आपल्या फॅन्ससोबत सोशलमिडीयावर शेअर केले आहेत.










