साखरपुड्याच्या 6 वर्षांनी घेतला निर्णय
पॉपस्टार कॅटी पेरी आणि अभिनेता ऑरलँडो ब्लूम हे 2016 मध्ये परस्परांना भेटले होते आणि यानंतर प्रेमात पडले होते तर 2019 मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. आता सुमारे 6 वर्षांनी दोघांनी स्वत:चे नाते संपुष्टात आणत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे.
कॅटी पेरी आणि ऑरलँडो यांच्यातील नाते आता अधिकृत स्वरुपात समाप्त झाले आहे. दोघेही मागील अनेक महिन्यांपासून स्वत:च्या मुलीचे सार्वजनिक स्वरुपात पालनपोषण करत आहेत. त्यांची प्राथमिकता स्वत:च्या मुलीला प्रेम, स्थिरता आणि परस्पर सन्मानासह वाढविणे असल्याचे सांगण्यात आले.
कॅटी आणि ऑरलँडो यांची पहिली भेट 2016 मध्ये झाली होती. यानंतर दोघांनी 2019 साली एंगेजमेंट केली होती. मग ऑगस्ट 2020 मध्ये या जोडप्याने स्वत:ची मुलगी डेजी डोवचे स्वागत केले होते. ब्लूम आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी ऑस्ट्रेलियन मॉडेल मिरांडा केर यांना फ्लिन नावाचा एक मुलगा आह। ज्याचा जन्म 2011 मध्ये झाला होता.









