वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
कॅनडाची 15 वर्षीय महिला जलतरणपटू केटी लेडेकीने महिलांच्या 400 मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारातील विश्वविजेतेपद स्वतःकडे पुन्हा राखले. येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत लेडेकीने सुरूवातीपासूनच आघाडी घेत शेवटी जेतेपद हस्तगत केले.
विश्व जलतरण चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील लेडेकीचे हे 16 वे सुवर्णपदक आहे. 2019 साली झालेल्या विश्व जलतरण स्पर्धेत तिला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. लेडेकीने तीन मिनिटे, 58.15 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले. या क्रीडाप्रकारात मॅक्लेनटोशने रौप्यपदक तर अमेरिकेच्या स्मिथने कास्यपदक घेतले.









