वृत्तसंस्था/ टोकियो
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅन पॅसिफीक खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या 28 वर्षीय केटी बोल्टरने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना बिनाका अॅन्ड्रेस्क्युव्हचा पराभव केला.
शुक्रवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बोल्टरने बिनाकावर 6-2, 6-1 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेती अमेरिकेच्या सोफीया किनेनने कॅसेटकिनाचा 6-3, 6-4 असा फडशा पाडत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. किनेन आणि बोल्टर यांच्यात उपांत्यफेरीचासामना होईल.









