Kathamala activists to Osmanabad for Saneguruji Kathamala convention
अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचे वार्षिक अधिवेशन उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथे शनिवारी २८ व २९ जानेवारीला होत आहे. या अधिवेशनासाठी या कथामालेचे जिल्हयातील अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील कथामालेचे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी उस्मानाबाद येथे रवाना झाले आहेत.
या दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात ग्र॔थदींडी, बालआनंद मेळावा, व्याख्यान गुणवंत पुरस्कार वितरण, आदर्श कथामाला कथाकथन, शैक्षणिक गुणवत्ता चिंतन व मार्गदर्शन, सानेगुरुजींचे कार्य आणि चळवळ, एकपात्री नाट्य, सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे. मालवण कथामाला ही एक आदर्श संस्था असून त्यांचे कार्य जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीसह सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे. या अधिवेशनासाठी जिल्हयातील रामचंद्र वालावलकर, रामचंद्र कुबल, रामकृष्ण रेवडेकर, दत्ताराम सावंत, सय्यद भाई, पिसारा सोलकर, आपताब पटेल, महम्मद सय्यद आदी सहभागी होत आहेत.
ओटवणे प्रतिनिधी