खानापूर तालुका भाजपचे वन खात्याच्या राज्य प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना निवेदन
प्रतिनिधी/ खानापूर
कस्तुरी रंगराजन अहवालाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये यासाठी खानापूर तालुका भाजपच्या वतीने राज्य प्रिन्सिपल सेक्रेटरी वन खाते आर के सिंह यांना बेंगलोर येथे भेटून निवेदन देण्यात आले, तालुक्यातील 62 गावांचा समावेश रंगराजन अहवाला करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील जनजीवन कठीण बनणार आहे. तसेच या भागात लोकांना शेती करणे व जगणे कष्टप्रद होणार आहे. यासाठी याबाबत 2017 माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या नेतृत्वाखाली याबाबत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले होते.याचाच पाठपुरावा करण्यासाठी खानापूर तालुका भाजपच्या वतीने सीसीएफ आरकेसी यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी आर.के . सिंह यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी व वनमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे.शासनाच्या वतीने या अहवालाला विरोध करण्यात येणार आहे, याबाबत कॅबिनेट बैठकीत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले या शिष्टमंडळात खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, के एफ डी सी चे संचालक सुरेश देसाई, मारुती पाटील, बाबुराव देसाई, गुंडू तोपिनकट्टि, अशोक देसाई हे उपस्थित होते.